एक्स्प्लोर
India: 'ही' आहे भारतातील सर्वात महागडी शाळा; वर्षाची फी माहिती आहे?
Most Expensive School of India: आपल्या देशात अशा बऱ्याच महागड्या शाळा आहेत, पण आज देशातील सर्वात जास्त महागड्या शाळेबद्द आणि तेथील फीबद्दल जाणून घेऊया.

The Doon School, Dehradun
1/10

आपल्या पाल्याला उत्तम शाळेत पाठवण्याचं प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं. त्यासाठी ते कितीही फी भरण्यास तयार असतात. अशीच एक नावाजलेली शाळा उत्तराखंडमध्ये आहे.
2/10

सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या डेहराडूनमध्ये भारतातील सर्वात महागडी शाळा आहे. 'दून स्कूल' असं या शाळेचं नाव आहे, ही शाळा देश-विदेशात प्रसिद्ध आहे.
3/10

दून स्कूलची गणना भारतातील सर्वात महागड्या आणि सर्वोत्तम संस्थांमध्ये केली जाते.
4/10

डेहराडूनमध्ये असलेल्या 'दून स्कूल'मध्ये प्रवेश घेणं तितकं सोपं नाही. प्रवेश मिळाला तरी येथील शुल्क (School Fees) भरणं कठीण होतं.
5/10

'द दून' स्कूलच्या वार्षिक फीबद्दल बोलायचं झालं, तर ती भारतीय रुपयांमध्ये 10 लाख ते 11 लाखांपर्यंत आहे. भारतात सामान्य माणसाचं वार्षिक उत्पन्नही इतकं नसतं.
6/10

फोटो पाहून या शाळेतील भव्य परिसराचा अंदाज येऊ शकतो. ही शाळा डेहराडूनच्या मॉल रोड येथे आहे.
7/10

या शाळेत फक्त बडे उद्योगपती आणि सेलिब्रिटींची मुलं शिकतात. 'द दून स्कूल'ची स्थापना 1935 मध्ये झाली.
8/10

दून स्कूल ही मुलांची खाजगी बोर्डिंग शाळा आहे. या शाळेचा कॅम्पस 70 एकरमध्ये पसरलेला आहे.
9/10

दून स्कूल 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना प्रवेश देते. प्रवेशासाठी कठीण परीक्षा आणि मुलाखती द्याव्या लागतात. येथे फक्त दोन वर्गांमध्ये प्रवेश उपलब्ध आहे. इयत्ता 7वी आणि इयत्ता 8वी.
10/10

दून स्कूलमधून देशातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी शिक्षण घेतलं आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये राजीव गांधी, राहुल गांधी, ज्योतिरादित्य सिंधिया, पटनायक, जितिन प्रसाद, मणिशंकर अय्यर, अमिताव घोष, विक्रम सेठ, तरुण ताहिलियानी, संदीप खोसला, अली फजल, चंद्रचूड सिंग आणि अभिनव बिंद्राचा समावेश आहे.
Published at : 07 Oct 2023 04:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
पुणे
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion