एक्स्प्लोर

KKR vs RCB : पहिल्याच सामन्यात दारुण पराभव का झाला? अजिंक्य रहाणे टीम कुठं चुकली ते सांगत म्हणाला... आम्ही 13 व्या ओव्हरपर्यंत....

IPL 2025 : आयपीएलच्या 18 व्या हंगामातील पहिल्याच सामन्यात गतविजेत्या केकेआरचा पराभव झाला आहे. आरसीबीनं केकेआरला 7 विकेटनं पराभूत केलं. 

IPL 2025 KKR vs RCB Ajinkya Rahane कोलकाता : आयपीएलच्या 18 व्या हंगामाची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं विजयानं सुरुवात केली. तर, गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला पहिल्याच सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. केकेआरचा कॅप्टन अजिंक्य रहाणे यानं संघाचं नेमकं काय चुकलं, मॅच टीमच्या हातून कधी निसटली यासंदर्भातील माहिती मॅच संपल्यानंतर दिली. अजिंक्य रहाणे म्हणाला आम्ही  13 व्या ओव्हरपर्यंत चांगल्या स्थितीत होतो. मात्र, व्यंकटेश अय्यर, रिंकू  सिंग आणि आंद्रे रसेलच्या विकेट गेल्या आणि आम्ही दबावात आलो, असं अजिंक्य रहाणे म्हणाला. केकेआरच्या एका वेळी 210 होतील असं वाटत असताना केवळ 174 धावा झाल्या.

पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कार्यक्रमात अजिंक्य रहाणे म्हणाला "मला वाटतं आम्ही 13 व्या ओव्हरपर्यंत चांगला खेळ करत होतो, मात्र2-3 विकेट गेल्यानं आमची लय बिघडली. त्यानंतर गोलंदाजांनी त्यांच्या बाजूनं पूर्ण प्रयत्न केले. मात्र, ते यशस्वी झाले नाहीत. जेव्हा व्यंकटेश अय्यर फलंदाजी करत होता तेव्हा आम्ही 200-210 धावा केल्या जाऊ शकतात, अशी चर्चा करत होतो. मात्र त्या विकेटनं आमची लय मोडली." 

अजिंक्य रहाणे यानं पुढं म्हटलं की थोडं दव होतं, मात्र आरसीबीनं पॉवरप्लेमध्ये चांगली फलंदाजी केली. आम्ही 200 पेक्षा अधिक धावसंख्येची अपेक्षा करत होतो. आम्ही या कामगिरीबाबत अधिक विचार करणार नाही. मात्र, काही गोष्टींवर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करु. एकावेळी कोलकाताची टीम 200 पार जाईल असं दिसत होतं, मात्र 175 धावा देखील झाल्या नाहीत. 

कोलकातानं  12 ओव्हरमध्ये 125  धावा केल्या होत्या. मात्र, पुढच्या 8 ओव्हर्समध्ये त्यांनी 49 धावा केल्या. व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल हे लवकर बाद झाले. अंगकृष रघुवंशी देखील मोठी खेळी करु शकला नाही. केकेआरच्या मॅनेजमेंटनं फलंदाजीसाठी इम्पॅक्ट प्लेअर नियम न वापरता गोलंदाजीसाठी वापरण्याचा निर्णय घेतलेला. मात्र, त्यांना अपेक्षित फायदा मिळवता आला नाही.  

आरसीबीचा दणदणीत विजय

गतविजेत्या केकेआरला पराभूत करत आरसीबीनं विजयानं सुरुवात केली. आरसीबीनं आयपीएलच्या 18 व्या हंगामातील पहिल्या मॅचमध्ये केकेआरला 7 विकेटनं पराभूत केलं. केकेआरनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 174 धावा केल्या होत्या. आरसीबीनं हे आव्हान 16.2 ओव्हरमध्ये  177 करत पार केलं. या विजयानं आरसीबीनं गेल्या तीन वर्षांचा हिशोब पूर्ण केला. कारण, गेल्या तीन आयपीएलमध्ये आरसीबीला केकेआर विरुद्ध विजय मिळवता आला नव्हता. विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांच्या अर्धशतकानं केकेआरचा त्यांच्याच होम ग्राऊंडवर बँड वाजवण्यात आरसीबीला यश आलं.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित

व्हिडीओ

ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत मराठवाड्यात कुणाचा गुलाल, कोण बेहाल? Special Report
Pashchim Maharashtra Elecction : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report
ZP konkan Result : जिल्हा परिषदेत सिंधुदुर्ग राणेंचो, रत्नागिरी सामंतांची Special Report
Political Family Result : घराणेशाहीचा कुठे जय, कुठे पराजय? Special Report
Pashchim Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
Embed widget