एक्स्प्लोर
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर सहकुटुंब राष्ट्रपती भवनमध्ये, दिलखुलास गप्पा अन् राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'खास भेट'
Sachin Tendulkar: टीम इंडियाचा मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने आज सहकुटुंब राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी, राष्ट्रपती भवन परसरात राष्ट्रपतींसोबत फिरुन फोटोशूटही केली.
Sachin tendulkar with president draupadi murmu
1/7

टीम इंडियाचा मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने आज सहकुटुंब राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी, राष्ट्रपती भवन परसरात राष्ट्रपतींसोबत फिरुन फोटोशूटही केली
2/7

राष्ट्रपती भवनमधील या सत्रासाठी अनेक भावी खेळाडू आणि विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची देखील उपस्थिती होती.
3/7

सचिनने सांघिक कार्य, इतरांची काळजी घेणे, इतरांचे यश साजरे करणे, कठोर परिश्रम करणे, मानसिक व शारीरिक कणखरता विकसित करणे, यांसह व्यक्तीमत्व विकास व जीवनात बदल घडवणाऱ्या घटनांवरुन मार्गदर्शन केलं.
4/7

भविष्यातील स्पोर्ट्स-स्टार हे देशाच्या दुर्गम भागातून, आदिवासी समुदायांमधून आणि विशेषाधिकार नसलेल्या ग्रामीण भारतातून येतील, असे सचिनने यावेळी म्हटले.
5/7

दरम्यान, राष्ट्रपती भवनमध्ये सचिन तेंडलुकरसह त्याची पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकर हेही उपस्थित होते
6/7

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भातील फोटो शेअर करण्यात आले असून व्हिडिओ देकील समोर आला आहे.
7/7

सचिन तेंडुलकरने सहारा स्पॉन्सर असलेली कसोटी क्रिकेटमधील आपली जर्सी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेट दिली. या जर्सीवर सचिनने सहीही केल्याचं पाहायला मिळत आहे.
Published at : 06 Feb 2025 09:28 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण


















