बॉलिवूडचा 'राजा' होण्यापासून छावा फक्त दोन पावलं दूर, नंबर 1 बनण्यासाठी दोन सिनेमे सर करणं बाकी
chhava box office collection day 37 : छावा चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या स्थानी पोहोचण्यासाठी 9 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

chhava box office collection day 37 : दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला आणि अभिनेता विक्की कौशल, अभिनेता अक्षय खन्ना आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या छावा या सिनेमाला प्रेक्षकांचा 37 व्या दिवशी देखील तुफान प्रतिसाद मिळतोय.
छावा या सिनेमाने रिलीज झाल्यापासूनच्या प्रत्येक विकेंडमध्ये कमाईच्या बाबतीत नवे विक्रम करताना दिसत आहे. चित्रपटाने आज म्हणजेच ३७ व्या दिवशी शनिवारी मोठी कमाई केली आहे. चित्रपट लवकरच बॉलीवूडचा दुसरा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट बनण्याकडे वाटचाल करत आहे. म्हणजेच पुढील काही दिवसांत स्त्री 2 या सिनेमाचं 597.99 कोटी रुपयांचं लाइफटाइम कलेक्शन मागे पडणार आहे.
छावाची ही हवा, बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई
छावाने पहिल्या आठवड्यापासून पाचव्या आठवड्यापर्यंत मोठी कमाई करून 571.40 कोटी रुपये कमवले. प्रत्येक आठवड्यात चित्रपटाच्या कमाईशी संबंधित वेगवेगळे आकडे तुम्ही खालील सारणीत पाहू शकता.
| week 1 | 225.28 |
| week 2 | 186.18 |
| week 3 | 186.18 |
| week 4 | 43.98 |
| week 5 | 31.02 |
| एकूण | 571.40 |
तर चित्रपटाने तेलुगू भाषेतून 2 आठवड्यांत 11.80 कोटी आणि 2.61 कोटी कमवून 14.41 कोटी कमवले आहेत. छावाची 36 व्या दिवशीची कमाई 2.12 कोटी होती. म्हणजेच 36 दिवसांत एकूण कमाई 587.93 कोटी रुपये झाली आहे.
सॅकनिल्कच्या मते, आज 3:20 वाजेपर्यंत छावाने 1.14 कोटी रुपयांचा कमाई करून एकूण 589.07 कोटी रुपयांचा गल्ला जमा केलाय.
View this post on Instagram
संभाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित छावा इतिहास रचणार
बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त कमाई करणारी शाहरुख खानच्या चित्रपटाने एकूण 640.25 कोटी रुपये कमवले होते. पुढच्या आठवड्यात सलमान खानची सिकंदर किती प्रभावशाली ठरतो? याच्यावर छावा आणखी किती विक्रम मोडणार हे समजणार आहे. परंतु जर चित्रपटाने आणखी 9 कोटी रुपयांची कमाई केली तर बॉलीवूडमध्ये कमाईच्या बाबतीत दोन नंबरला असणाऱ्या स्त्री 2 ला नक्कीच मागे टाकेल.
मॅडॉक फिल्म्सने निर्मिती केलेला छावा या चित्रपटाच्या निर्मितीत 130 कोटी रुपये खर्च झाले आहेत. चित्रपटात विक्की कौशल संभाजी महाराज आणि अक्षय खन्ना औरंगजेबच्या भूमिकेत झळकले आहेत. रश्मिका मंदाना, डायना पेंटी, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंह यांनीही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
आणखी वाचा:























