Sanjay Raut : नीलम गोऱ्हेंच्या चिखलफेकीची जबाबदारी पवारसाहेब झिडकारु शकत नाहीत, ते सुद्धा तितकेच जबाबदार : संजय राऊत
Sanjay Raut : महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन भरवले आहे का? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कडाडून टीका केली आहे.

Sanjay Raut मुंबई: महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन भरवले आहे का? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कडाडून टीका केली आहे. दरम्यान, शिंदे सेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्यावर टीका करत असताना राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनाही (Sharad Pawar) लक्ष्य केलं आहे. हे जे साहित्य महामंडळ आहे त्यांच्याकडे खंडण्या घेऊन संमेलन भरवत आहेत. अशातच माननीय शरद पवार साहेब ही जी राजकीय चिखलफेक झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार (Sharad Pawar) साहेब सुद्धा झिडकरू शकत नाही. ते स्वागत अध्यक्ष होते. ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले राजकीय चिखल फेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. संमेलनाचे अध्यक्ष तारा भवळकर यांनी सुद्धा आणि पवार साहेबांनी देखील निषेध व्यक्त केला पाहिजे. ते गप्प कसे राहू शकतात? असा सवाल संजय राऊतांनी यावेळी केला आहे.
तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो. हे कोण बाई आहे नीलम गोऱ्हे कुठला भूत आहे? यात राजकारण झालं, हे साहित्य संमेलन नव्हतं. व्यासपीठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचच्या लोकांना का नाही बोलावलं? ते आम्ही कसे घडलो, आम्ही कसे बिघडलो आम्ही देखील सांगितलं असतं. असेही संजय राऊत म्हणाले. तर नीलम गोऱ्हे बाई नाही बाई माणूस आहे, विकृत आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केलीय.
.... मग हे मर्सडीज प्रकरण काय आहे ते त्यांना कळेल- संजय राऊत
कार्यक्रम पत्रिकेवर ते उषा तांबे यांनी ठरविले त्यांचे पतीराज हे महाराष्ट्राचे पीडब्ल्यूडी सेक्रेटरी होते. ते सगळ्यात भ्रष्ट खातं आहे. मराठी भाषेवरती, राजकारणावरती कार्यक्रम ठरवणारे नीलम गोऱ्हे यांचे कालचे वक्तव्य आहे. ही त्यांची विकृती आहे. ज्या घरात तुम्ही खाल्लं, आमदार झाल्यात त्या विरोधात आज बोलत आहात. मला आठवत आहे बाळासाहेब ठाकरे बोलले होते ही बाई कोण आणली. काही लोकांच्या मर्जी खातीर त्या आल्या, गेल्या चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या. त्या बाईंचं कर्तृत्व काय? विधान परिषदेत हे जर समजून घ्यायचं असेल तर पुण्यात महानगरपालिकेत आमचे गटनेते होते अशोक हरनाळ त्यांची मुलाखत घ्या. त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचा प्लानिंग डीपी सुरू होतं तेव्हा कोणा कोणाच्या नावावर या बाईने कोट्यावधी रुपये गोळा केले? हे गटनेते अशोक हरणळ यांची मुलाखत घ्या, मग हे मर्सडीज प्रकरण काय आहे ते त्यांना कळेल. अशी घणाघाती टीका करत संजय राऊतांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर तोफ डागली.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
