बेल्स उडाल्या, लाईट लागली; तरीही पंचांनी सुनील नरेनला 'हिट विकेट' आऊट का दिलं नाही? नियम काय सांगतो?
Sunil Narine hit wicket rule : बेल्स उडाल्या, लाईट लागली; तरीही पंचांनी सुनील नरेनला 'हिट विकेट' आऊट का दिलं नाही? नियम काय सांगतो?

Sunil Narine hit wicket rule : इंडियन प्रिमिअर लीग (IPL) म्हणजेच आयपीएल 2025 चा पहिला सामना शनिवारी (दि.22) कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवण्यात आला. आरसीबी (KKR) विरुद्ध केकेआर (RCB) यांच्यादरम्यान, हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात रजत पाटीदार याच्या नेतृत्वातील आरसीबीच्या संघाने विजय मिळवलाय, तर अजिंक्य राहाणेच्या केकेआरला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय.
दरम्यान, या सामन्यात कोलकाताचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. यावेळी फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या सुनील नरेनची बॅट स्टंपला लागली होती. त्यानंतर बेल्सही उडाल्या आणि लाईट्स देखील लागल्या होत्या. मात्र, तरीही सुनील नरेनला पंचांकडून बाद देण्यात आलं नाही. कोलकाताचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला असताना 8 व्या षटकात हा प्रकार घडला. यावेळी आरसीबीकडून रसिख सलाम दार गोलंदाजी करत होता.
रसिखने राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना शॉर्ट बॉल टाकला होता. सुनील नरेनने जोरदार बॅट घुमवली. मात्र, बॉल वेगाने यष्टीरक्षकाच्या हाती गेला. पंचांनी बॉल बाऊन्स झालेला पाहून वाईड दिला. त्याचवेळी सुनील नरेनची बॅट स्टंपला लागली. बेल्स पडल्या आणि लाईटही लागल्या. पहिल्यांदा असं वाटलं की, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांचं याच्यावर लक्ष गेलं नाही. मात्र, नरेनची बॅट स्टंपला लागून देखील त्याला हिट विकेट देण्यात आले नाही.
सुनील नरेनला आऊट का दिले नाही? नियम काय सांगतो?
सुनील नरेन ज्या चेंडूवर हिट विकेट झाला असं बोललं जातंय, तो चेंडू पंचांनी वाईड बॉल दिला होता. त्यामुळे सुनील नरेनला आऊट देण्यात आले नाही. एमसीसी नियम 35.1.1 च्या नुसार, गोलंदाजाने टाकलेला चेंडू टाकल्यानंतर फलंदाजाकडून फेस करत असताना त्याची बॅट किंवा शरीर स्टंपला लागले आणि बेल्स पडल्या तर तो फलंदाज आऊट असतो.
Lol Lockdown kid Crying over Sunil Narine hit on wicket 😭🤣
— 𝑷𝒆𝒂𝒄𝒆𝒇𝒖𝒍 𝑻𝒉𝒐𝒖𝒈𝒉𝒕 (@Peaceful_Th) March 22, 2025
Lol Narine wasn't hit wicket bcs he hitted the wicket after the ball being bowled and not while playing it.#IPL2025 #RCBvsKKR pic.twitter.com/1Q20tktcBJ
पहिल्या सामन्यात आरसीबीचा दणदणीत विजय
दरम्यान, आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात आरसीबीने केकेआरचा पराभव केलाय. प्रथम फलंदाजी करत असताना केकेआरने 174 धावा केल्या होत्या आणि आरसीबीसमोर 175 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. केकेआरचं हे आव्हान आरसीबीने 16.2 षटकात सहजरित्या गाठलं. आरसीबीकडून विराट कोहली आणि फिलीप साल्टने अर्धशतकी खेळी करत आपल्या टीमला विजय मिळवून दिला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

