Virat Kohli : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात किंग खानकडून कोहली कोहलीचा गजर, रिंकू सिंगकडून विराटचा अपमान? नेमकं काय घडलं?
Virat Kohli : आयपीएलच्या 18 व्या पर्वाचं उद्घाटन कोलकाता येथे झालं. या सोहळ्यात शाहरुख खाननं विराट कोहली आणि रिंकू सिंग यांच्याशी संवाद साधला.

कोलकाता : आयपीएलचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला. कोलकाता येथील इडन गार्डन्स मैदानावर शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यात अभिनेता शाहरुख खान यानं विराट कोहली आणि रिंकू सिंग यांच्याशी संवाद साधला. यावेळी रिंकू सिंगनं विराट कोहलीचा अपमान केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
शाहरुख खाननं विराट कोहलीला पहिल्यांदा मंचावर बोलावलं, यावेळी विराट कोहली हा आयपीएलमधील एकमेव खेळाडू आहे ज्यानं आयपीएलचे सर्व हंगाम एकाच संघाकडून खेळल्याचं म्हटलं. विराट कोहलीला शाहरुख खाननं प्रश्न विचारले. बोल्ड जनरेशनच्या काळात गोल्ड जनरेशन कशी कामगिरी करेल असा प्रश्न शाहरुख खाननं विचारला. बोल्ड जनरेशन वेगानं ताकदीनं येत आहे पण गोल्ड जनरेशन इथंच आहे, परिणाम करण्यासाठी आणि चांगला खेळ करण्यास सज्ज असल्याचं विराट कोहलीनं म्हटलं.
यानंतर शाहरुख खाननं रिंकू सिंगला मंचावर बोलावलं. यावेळी रिंकू सिंगनं मंचावर येताना शाहरुख खानसोबत हात मिळवला. मात्र, विराट कोहलीशी त्यानं हात मिळवला नाही. विराट यावेळी त्याच्याकडे पाहात होता. हा व्हिडिओ शेअर करत विराट कोहलीच्या चाहत्यांनी रिंकू सिंगनं अपमान केल्याचं म्हटलं.
Jis tarah Rinku Singh King Kohli ko Ignore Kiya hai Bahut Galat Kiya, Bhale IPL me RCB ko Support Mai Nahi Karta Lekin Ek Senior Player Ke Sath, Itna Ghamand Thik Nahi 😎 pic.twitter.com/7wtiwFRpjN
— 🚩 (@rranjan257) March 22, 2025
विराट कोहलीचं अर्धशतक
आयपीएलच्या 18 व्या हंगामाची सुरुवात केकेआर आणि आरसीबी यांच्यातील लढतीनं झाली. आरसीबीनं केकेआरचा 7 विकेटनं पराभव केला. विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीनं पहिला विजय मिळवला. गतविजेत्या केकेआरला पहिल्याच लढतीत पराभव स्वीकारावा लागला. केकेआरनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 174 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग आरसीबीनं 16.2 ओव्हरमध्येच 7 विकेट राखून केला. यानिमित्तानं आरसीबीनं 18 व्या पर्वाची सुरुवात विजयानं केली आहे. विराट कोहली आणि फिल सॉल्ट या दोघांनी आरसीबीला 95 धावांची भागिदारी करुन दिली. या दोघांच्या विजयानं आरसीबीच्या विजयाचा पाया रचला. विराट कोहलीनं 59 धावा केल्या तर फिल सॉल्टनं 56 धावा केल्या. यानंतर आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदारनं 34 धावांची खेळी करत विजय मिळवला.
दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजी करताना केकेआरनं 174 धावा केल्या. सुनील नरेन आणि अजिंक्य रहाणे यांनी चांगली कामगिरी केली. सुनील नरेननं 44 तर अजिंक्य रहाणेनं 56 धावा केल्या. मात्र, कृणाल पांड्यानं तीन विकेट घेतल्या. यामुळं केकेआरला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

