एक्स्प्लोर
पेपरला 15 मिनिटे, घाटात ट्रॅफिक जाम, पाचगणीचा पठ्ठ्या थेट पॅराग्लायडिंगने परीक्षा केंद्रावर पोहोचला!
परीक्षेला उशीर होईल म्हणून एका पठ्ठ्याने चक्क पॅराग्लायडिंगने परीक्षा केंद्र गाठल्याचा आश्चर्यजनक प्रकार समोर आला आहे. महाबळेश्वरमधील ही भुवया उंचावणारी घटना आहे.
student fly with paraglayding for exam
1/7

परीक्षेला उशीर होईल म्हणून एका पठ्ठ्याने चक्क पॅराग्लायडिंगने परीक्षा केंद्र गाठल्याचा आश्चर्यजनक प्रकार समोर आला आहे. सातारा जिल्ह्यातील आणि थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमधील ही भुवया उंचावणारी घटना आहे.
2/7

महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची नेहमीच गर्दी असते, त्यात विकेंडला आलेले पर्यटक आणखी आपला मुक्काम वाढवतात. मात्र, सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे दिवस सुरू आहेत.
3/7

पर्यटकांची झालेली गर्दी, त्यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी आणि परीक्षेला होत असलेला उशीर पाहून एका पठ्ठ्याने चक्क पॅराग्लायडींगने परीक्षा केंद्र गाठले. घाटातून कारने प्रवास करायला वेळ लागेल म्हणून विद्यार्थ्याने हा निर्णय घेतला
4/7

सोशल मीडियावर सध्या या विद्यार्थ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून महाबळेश्वरमधील हॅरिसन फॉली पॉइंट येथून पसारनी घाट सेक्शन पर्यंत या विद्यार्थ्याने पॅराग्लायडिंगाने प्रवास करत परीक्षा केंद्र गाठलं
5/7

महाबळेश्वरमधील घाटात होत असलेल्या वाहतूक कोंडीचा मुद्दा पुन्हा एकदा ह्या पॅराग्लायडींगच्या घटनेमुळे समोर आला आहे. विकेंड आणि वर्षाअखेर व सुट्ट्यांच्या हंगामात या घाटावरील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनते.
6/7

परीक्षा देणारा हा विद्यार्थी बी.कॉम प्रथम वर्षात शिकणारा विद्यार्थी असून तो हॅरिसन फॉली पॉइंटवर स्वत:चं ऊसाच्या रसाचं दुकान आणि ज्युस सेंटर चालवतो
7/7

महाबळेश्वरमधील पाचगणीपासून 5 किमी अंतरावर हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. रविवार 15 डिसेंबर रोजी पर्यटकांना ऊसाचा ताजा रस पाजण्यात तो व्यस्त होता.
Published at : 17 Feb 2025 01:44 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















