एक्स्प्लोर

Suryakumar Yadav : ऋतुराज गायकवाड येताना दिसला , सूर्यकुमार यादवनं 'ती' गोष्ट लपवली अन् नंतर मिठी मारली, मुंबई इंडियन्सकडून Video शेअर

MI vs CSK : आज आयपीएलमधील दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने येणार आहेत. या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

IPL 2025 MI vs CSK Suryakumar Yadav Ruturaj Gaikwad चेन्नई : आयपीएलची केकेआर आणि आरसीबी यांच्यातील मॅचनं धडाक्यात सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलेली मुंबई इंडियन्स पुन्हा सज्ज झाली आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज देखील ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वात दुसऱ्या हंगामाची सुरुवात करण्यासाठी तयार आहे. आज आयपीएलच्या चाहत्यांसाठी सुपर संडे आहे. कारण, राजस्थान रॉयल्स आणि सन रायजर्स हैदराबाद यांच्यात दुपारी मॅच होणार आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. चेन्नई आणि मुंबई च्या मॅचची आयपीएलच्या चाहत्यांना प्रतीक्षा असते. दोन्ही संघाचे चाहते या सामन्याच्या निमित्तानं आपापल्या भावना व्यक्त करत असतात. मॅचला एक दिवस बाकी असताना मुंबई इंडियन्सनं एक व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओचं कॅप्शन देताना मुंबई इंडियन्सनं  सूर्या बदलणार नाही, असं कॅप्शन दिलं आहे. 

ऋतुराज गायकवाड येताना दिसताच...

चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड आपल्याकडे येतोय हे दिसताच सूर्यकुमार यादवनं मुंबई इंडियन्सशी संबंधित असलेली एक नोट किंवा कार्ड आपल्या खिशात ठेवण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा ते खिशात जात नसल्यानं सूर्यकुमार यादवनं पुन्हा ते व्यवस्थित ठेवलं. तोपर्यंत ऋतुराज गायकवाड त्याच्या जवळ पोहोचला होता. यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सनं त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. 

मुंबई चेन्नई आमनेसामने  

मुबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकलं आहे. आज आयपीएलचे दोन सामने पार पडणार आहेत. यामध्ये दुपारी साडे तीन वाजता राजस्थान रॉयल्स विरुद्ध सन रायजर्स हैदराबाद यांच्यात लढत होईल. त्यानंतर सायंकाळी साडे सात वाजता चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडिनय्स यांच्यात लढत होईल.

सूर्यकुमार यादवकडे संघाचं नेतृत्व

गेल्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी गोलंदाजी करताना स्लो ओव्हर रेटच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं  कॅप्टन हार्दिक पांड्यावर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. यामुळं चेन्नई विरूद्धच्या सामन्यात संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. 

दरम्यान, मुंबई आणि चेन्नई यांच्यातील लढत चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई आणि मुंबई यांच्यापैकी कोणता संघ 2025 च्या आयपीएलची विजयानं सुरुवात करतो ते पाहावं लागेल. चेन्नई घरच्या मैदानावर कशी कामगिरी करते याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. याशिवाय महेंद्रसिंह धोनी देखील क्रिकेट चाहत्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, जानेवारीचे 1500 रुपये देण्यास मज्जाव, निवडणूक आयोगाचा निर्णय
मोठी बातमी, लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, जानेवारीचे 1500 रुपये देण्यास मज्जाव
Share Market : शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांना अखेर दिलासा, एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंकडून भाजपचा गेम; अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, गणितच बिघडलं
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंकडून भाजपचा गेम; अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, गणितच बिघडलं
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार
Embed widget