तेव्हा मनिषा कायंदे म्हणाल्या, भाजपा आणि राणे गँगने संबंध जोडून थयथयाट केला, आदित्य ठाकरेंची नाक घासून माफी मागावी, आता सुषमा अंधारे तोच स्क्रीनशाॅट शेअर करत म्हणाल्या....
8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरात 14व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला. पोलिसांनी याला आत्महत्या म्हटले होते. त्यावेळी दिशाच्या वडिलांनी तपास समाधानकारक मानला होता.

Sushma Andhare on Manisha Kayande : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर नोंदवावा आणि मुलीच्या मृत्यूची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचिकेत सूरज पांचोली, दिनो मोरिया आणि मुंबई पोलिसांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरात 14व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला. पोलिसांनी याला आत्महत्या म्हटले होते. त्यावेळी दिशाच्या वडिलांनी तपास समाधानकारक मानला होता.
दरम्यान, या मुद्यावरून आज विधानसभेतत जोरदार राडा झाला. विधानपरिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आदित्य ठाकरे यांचं न्यायालय काय करायचं ते ठरवेल म्हणत किरीट सोमय्या तसेच जयकुमार गोरेंवर कारवाई का होत नाही? असा सवाल केला. किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला गेली होती, जयकुमार गोरे यांचे उघडे नाxगडे फोटो सभागृहात आल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मनिषा कायंदे यांचंही जूनं ट्विट दाखवत सरडा देखील इतक्या लवकर रंग बदलत नाही, पण यांनी बदलला म्हणत बोचरी टीका केली.
आता कसं... मनीषा मॅडम म्हणतील तसं.. !
मनिषा कायंदे यांच आदित्य ठाकरे यांची नाक घासून माफी मागावी, हे ट्विट व्हायरलं झालं आहे. आता याच ट्विटचा सुषमा अंधारे यांनी स्क्रीनशाॅट शेअर करत हल्लाबोल केला आहे. आता कसं... मनीषा मॅडम म्हणतील तसं.. ! असं म्हणत मनिषा कायंदे यांना आणि सीएम देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.
आता कसं... मनीषा मॅडम म्हणतील तसं.. ! @KayandeDr @Dev_Fadnavis pic.twitter.com/FQzWs2XFqg
— SushmaTai Andhare (@andharesushama) March 20, 2025
8 जून 2020 रोजी दिशाचा मृत्यू
दरम्यान, 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरात 14व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला. पोलिसांनी याला आत्महत्या म्हटले होते. त्यावेळी दिशाच्या वडिलांनी तपास समाधानकारक मानला होता. दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी एक व्हिडिओ समोर आला होता. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की हा व्हिडिओ त्याच्या मृत्यूच्या एक तास आधीचा आहे. व्हिडिओमध्ये दिशा तिच्या मित्रांसोबत डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिशाचा बॉयफ्रेंड रोहनही दिसत आहे. असा दावा करण्यात आला होता की दिशाने 8 जून 2020 रोजी रात्री 11:48 वाजता मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये व्हिडिओ पोस्ट केला होता. सुमारे तासाभरानंतर आत्महत्या केली. व्हिडीओ समोर आल्यानंतर ती एवढी आनंदी असताना तिने आत्महत्या का केली, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, व्हिडिओबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

