KKR vs RCB IPL 2025 : आधी कृणाल पांड्या, नंतर विराट-सॉल्टचा धमाका! पहिल्या सामन्यात आरसीबीने उडवला केकेआरचा धुव्वा
आरसीबीने कोलकाता नाईट रायडर्सचा 7 विकेट्सने पराभव करून आयपीएल 2025 ची सुरुवात मोठ्या विजयाने केली आहे.

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru 1st Match : आरसीबीने कोलकाता नाईट रायडर्सचा 7 विकेट्सने पराभव करून आयपीएल 2025 ची सुरुवात मोठ्या विजयाने केली आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करत 174 धावा केल्या, प्रत्युत्तरात बंगळुरू संघाने 7 विकेट्स बाकी असताना लक्ष्य गाठले. या सामन्यात आरसीबीच्या विजयाचे हिरो विराट कोहली आणि फिल साल्ट ठरला. तर गोलंदाजी करताना, कृणाल पांड्याने बेंगळुरूसाठी चांगली कामगिरी केली.
Spirited comeback with the ball ✅
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2025
Dominating effort with the bat ✅@RCBTweets are up and away in #TATAIPL 2025 with a commanding win over #KKR ❤️
Scorecard ▶ https://t.co/C9xIFpQDTn#KKRvRCB pic.twitter.com/zs6fXmhYv9
आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात विराट-सॉल्टचा धमाका!
विराट कोहली आयपीएल 2024चा ऑरेंज कॅप विजेता होता, त्याने आयपीएल 2025 मध्येही त्याची लय कायम ठेवली. पहिल्याच सामन्यात त्याने 36 चेंडूत 59 धावांची तुफानी खेळी खेळली. त्याने फिल सॉल्टसोबत 95 धावांची सलामी भागीदारी केली. साल्टने 31 चेंडूत 56 धावांच्या वादळी खेळीने आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली होती. खरं तर, दोघांनी मिळून पॉवर प्लेमध्येच बेंगळुरू संघाचा स्कोअर 80 धावांपर्यंत नेला.
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारनेही 16 चेंडूत 34 धावा करून आपल्या संघाच्या विजयात मोठे योगदान दिले. शेवटी, स्पेन्सर जॉन्सनच्या चेंडूवर लियाम लिव्हिंगस्टोनने आरसीबीसाठी विजयी शॉट मारला.
सुनील नरेन आणि अजिंक्य रहाणे शतकी भागीदारी व्यर्थ
तत्पूर्वी, अजिंक्य रहाणे आणि सुनील नरेन यांच्या शतकी भागीदारीमुळे कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) समोर १७५ धावांचे लक्ष्य ठेवले. ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताची सुरुवात खुपच खराब झाली, पहिल्याच षटकात जोश हेझलवूडने क्विंटन डी कॉकची विकेट घेतली. त्याला फक्त चार धावा करता आल्या.
यानंतर, सुनील नरेन आणि अजिंक्य रहाणे यांनी जबाबदारी स्वीकारली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 55 चेंडूत 103 धावांची तुफानी भागीदारी झाली. कर्णधार रहाणेने फक्त 25 चेंडूत त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 31 वे अर्धशतक झळकावले. तो 31 चेंडूत 56 धावा करून आऊट झाला तर वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटपटू नरेनने पाच चौकार आणि तीन षटकारांसह 44 धावा केल्या.
यानंतर, केकेआरने एकामागून एक विकेट गमावल्या. अंगकृष रघुवंशीने 30, वेंकटेश अय्यरने 6, आंद्रे रसेलने 4, हर्षित राणाने 5 धावा करून आऊट झाला. दरम्यान, रमनदीप सिंग 6 धावांवर आणि स्पेन्सर जॉन्सन एका धावेवर नाबाद राहिले. अशाप्रकारे, केकेआरने 20 षटकांत आठ विकेट गमावून 174 धावा केल्या. आरसीबीकडून कृणाल पंड्याने तीन तर जोश हेझलवूडने दोन विकेट घेतल्या. याशिवाय यश दयाल, रसिक सलाम आणि सुयश शर्मा यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

