Astrology : आज बुधादित्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृषभसह 'या' 5 राशींना होणार धनवर्षाव, दुपटीने वाढणार पैसा
Astrology Panchang Yog 23 March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवशी जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे.या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 23 March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 23 मार्च म्हणजेच रविवारचा दिवस आहे. आच्या दिवसाचं स्वामी ग्रह सूर्य आहे. तसेच, आजच्या दिवशी चैत्र महिन्यातील नवमी तिथी आहे. आजच्या दिवशी मीन राशीत बुधाचं संक्रमण होऊन बुधादित्य योग जुळून येणार आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशी पूर्वाषाढाण नक्षत्र आणि वरियन योगाचा देखील शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवशी जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे.या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुम्हाला करिअरमध्ये चांगली प्रगती पाहायला मिळेल. तसेच, कोणतेही निर्णय घेताना घरातील ज्येष्ठांचं मत विचारात घ्याल. तसेच, गुंतवणुकीमध्ये तुमचा जास्त रस पाहायला मिळेल. एकूणच हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुम्हाला इच्छित फळ मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार उत्साहाचा असणार आहे. तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, जर आजच्या दिवशी तुम्हाला नवीन कामाची सुरुवात करायची असल्यास आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, मुलांच्या बुद्धीमत्तेचा चांगला विकास झालेला दिसेल. या काळात तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. तसेच, बिझनेसमधून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंदाचा असणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच, प्रत्येक कार्य करताना तुमच्यामध्ये उत्साह दिसून येईल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, तुम्हाला एखादी शुभवार्ता देखील ऐकायला मिळू शकते. एखाद्या नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करु शकता.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. या काळात तुमच्यातील नेतृत्वक्षमता चांगली दिसून येईल. तसेच, कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तुमचा कोणत्याही कामाच्या बाबतीत सकारात्मक दृष्टीकोण राहील. तसेच, तुमच्या कार्याने लोक प्रभावित होतील. या दरम्यान तुम्हाला अचानक धनलाभ देखील मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Dev 2025 : एप्रिल महिन्यात 'या' 3 राशींची होणार चांदी! शनीचा मीन राशीत होतोय उदय, मिळणार बक्कळ पैसा, यश पदरात पडणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

