एक्स्प्लोर

एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी, मंत्री शेलार यांची घोषणा; पालकमंत्रीपदाचाही मजेशीर किस्सा सांगितला

केरळ आयरस अशी एक एआय टिचर निर्माण करण्यात आली आहे. तंत्रज्ञान आलं त्यानंतर पाठ राहिले नाहीत, आर्टिफिशिअल संदर्भातले नवे आव्हान आपल्यासमोर आहे.

मुंबई : सध्या डिजिटल इंडियानंतर एआय इंडिया असंच पाहायला मिळत आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) म्हणजेच एआयचा वापर सर्वच क्षेत्रात करण्यासाठीची धडपड दिसून येत आहे. त्यामुळे, शासनाने देखील एआयसाठी धोरण आखायला सुरुवात केली असून महाराष्ट्राची एआय पॉलिसी एप्रिल महिन्यात येईल, अशी घोषणाच माहिती व तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांनी विधानपरिषद सभागृहात आज केली. भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांच्याकडून आर्टिफिशियल इंटिलिजन्स संदर्भात प्रश्न मांडण्यात आला होता. त्यावर मंत्री शेलार यांनी उत्तर दिले. दरम्यान, यावेळी शेलार (Ashish shelar) यांनी एआयचा मजेशीर किस्साही सांगितला. त्यावरुन, आमदार अनिल परब आणि आशिष शेलार यांच्यात चांगलीच मिश्कीलपणे जुबलबंदी रंगली. 

केरळ आयरस अशी एक एआय टिचर निर्माण करण्यात आली आहे. तंत्रज्ञान आलं त्यानंतर पाठ राहिले नाहीत, आर्टिफिशिअल संदर्भातले नवे आव्हान आपल्यासमोर आहे. चांगल्या दृष्टीने शिक्षणात हे येणे क्रांती ठरेल,  आपण यासंदर्भात एक समग्र धोरण आणावं, असा प्रश्न श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला होता. त्यावर, आता आशिष शेलार यांनी सभागृहात उत्तर दिले. 

एआय ही उद्याची भाषा जी जगाने ठरवली आहे,  दीड दोन आठवड्यात एकच चर्चा लावली आहे. जगातील नवीन संधी आणि आव्हानांचे स्वरुप एआयच्या रुपाने आलेलं आहे. संशोधन, रोजगार निर्मिती ज्ञान मिळवण्याची व्यवस्था आपण  इंटरनेट आल्यानंतर बघितली. एआयच्या सहाय्याने सर्वत्रच मूलभूत क्षेत्रात बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मग हे आव्हान आहे की अडचण आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. सन 2024 ला नीती आयोग, केंद्रातील विभाग, तज्ज्ञांकडून भारतीय एआय धोरण लाँच केलं गेलं. आता, आपण यासंदर्भात टास्क फोर्स बनवला आहे, एआयचा उपयोग होणार असेल तर नेमकं होणार काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यामुळे, राज्याची एआय पॉलिसी एप्रिल महिन्यात येईल, अशी माहिती माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिली. शिक्षणात पूरक व्यवस्था निर्माण करण्यासाठी नियम धोरण बनवावे लागेल, त्यासाठी समिती नेमू. शिक्षण तज्ज्ञ, पालक आणि शिक्षक हे सर्व त्या समितीमध्ये असतील,असेही शेलार यांनी यावेळी, सांगितले. 

एआय पालकमंत्रीवरुन जुगलबंदी

राज्याच्या एआय धोरणाबाबत विधानपरिषदेत चर्चा सुरू असताना एआयचे परिणाम आणि दुष्परिणामावर चर्चा सुरू होती. त्यावेळी पालकमंत्रीपदाबाबत आपण प्रश्न विचारला होता, कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री मिळणार असा प्रश्न मी एआयला विचारलं होता, असे मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले. तेव्हा एआयने सांगितल्यानुसार महाराष्ट्रातील 80 टक्के  जिल्ह्यांचे पालकमंत्री नेमले गेल्याचे उदाहरण आशिष शेलार यांनी सभागृहात दिले. शेलार यांच्या या उदाहरणावर अनिल परब यांनी मिश्लिल टोला लगावला. नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री देखील एआयला निवडायला सांगा, असे परब यांनी म्हणताच विधानपरिषदेत एकच हशा पिकला. तर, एआय तो तिढा सोडवू शकणार नाही, असं आशिष शेलार यांनीही गमतीत म्हटलं. त्यावर तिथे एआय नाही तर आय-माय आहे असे अनिल परब यांनी म्हटले. तर आय माय नाही "आयना का बायना" आहे, असे उत्तर पुन्हा आशिष शेलार यांनी दिले. त्यामुळे, एआय आणि पालकमंत्री पदावरुन विधानपरिषदेत चांगलीच मिश्कील जुगलबंदी पाहायला मिळाली.  दरम्यान, यावेळी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील सभागृहात उपस्थित होते

हेही वाचा

बीडमध्ये चाललंय काय, महिलेनं पोलीस ठाण्यासमोर अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना टळली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

औरंगजेब 1300 मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत, संतोष जुवेकरच्या जीवात जीव आला, दिशाने आघाडी घेतली! राज्यातील राजकीय चिखलफेकीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस
औरंगजेब 1300 मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत, संतोष जुवेकरच्या जीवात जीव आला, दिशाने आघाडी घेतली! राज्यातील राजकीय चिखलफेकीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस
Disha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?
Disha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?
Team India : बीसीसीआयकडून 'चॅम्पियन' टीम इंडियाला आयसीसीच्या बक्षीसाच्या तीनपट खजिना! रोहितपासून गंभीरपर्यंत, कोणाला किती कोटी मिळणार?
बीसीसीआयकडून 'चॅम्पियन' टीम इंडियाला आयसीसीच्या बक्षीसाच्या तीनपट खजिना! रोहितपासून गंभीरपर्यंत, कोणाला किती कोटी मिळणार?
बीडमध्ये चाललंय काय, महिलेनं पोलीस ठाण्यासमोर अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना टळली
बीडमध्ये चाललंय काय, महिलेनं पोलीस ठाण्यासमोर अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना टळली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Disha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?Yuzvendra Chahal + Dhanashree Verma : चहल आणि धनश्री मुंबईतील कोर्टात दाखल | FULL VIDEOChitra Wagh Angry Speech : ओ परब! तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघांचा रुद्रावतारABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 20 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
औरंगजेब 1300 मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत, संतोष जुवेकरच्या जीवात जीव आला, दिशाने आघाडी घेतली! राज्यातील राजकीय चिखलफेकीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस
औरंगजेब 1300 मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत, संतोष जुवेकरच्या जीवात जीव आला, दिशाने आघाडी घेतली! राज्यातील राजकीय चिखलफेकीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस
Disha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?
Disha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?
Team India : बीसीसीआयकडून 'चॅम्पियन' टीम इंडियाला आयसीसीच्या बक्षीसाच्या तीनपट खजिना! रोहितपासून गंभीरपर्यंत, कोणाला किती कोटी मिळणार?
बीसीसीआयकडून 'चॅम्पियन' टीम इंडियाला आयसीसीच्या बक्षीसाच्या तीनपट खजिना! रोहितपासून गंभीरपर्यंत, कोणाला किती कोटी मिळणार?
बीडमध्ये चाललंय काय, महिलेनं पोलीस ठाण्यासमोर अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना टळली
बीडमध्ये चाललंय काय, महिलेनं पोलीस ठाण्यासमोर अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना टळली
Balasaheb Thorat on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात माजी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य; बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले, 10 वर्षाचं सगळंच काढलं
दिशा सालियन प्रकरणात माजी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य; बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले, 10 वर्षाचं सगळंच काढलं
Meerut Case : हॅलो साहिल, सौरभ झोपलाय लवकर घरी ये; दोघांनी हात, शीर धडावेगळं केलं अन् बायको बाॅयफ्रेंडच्या घरी घेऊन गेली
हॅलो साहिल, सौरभ झोपलाय लवकर घरी ये; दोघांनी हात, शीर धडावेगळं केलं अन् बायको बाॅयफ्रेंडच्या घरी घेऊन गेली
Disha Salian & Aaditya Thackeray: ...तर उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे देश सोडून... रामदास कदमांचं मोठं वक्तव्य
शिवसेनाप्रमुखांच्या नातवावर बलात्काराचा आरोप होणे गंभीर गोष्ट, लाज असती तर उद्धव-आदित्य ठाकरेंनी आतापर्यंत देश सोडला असता: रामदास कदम
Video: ओ अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार
Video: ओ अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार
Embed widget