Shukra Transit 2025: उदे गं अंबे उदे! चैत्र नवरात्री 'या' 3 राशींसाठी गेमचेंजर ठरणार, सुवर्णकाळ सुरू होणार! अमाप संपत्तीचे धनी होण्याचे संकेत
Shukra Transit 2025: वैदिक पंचांगानुसार धन आणि समृद्धी देणारा शुक्र राशीबदल होत असल्याने ज्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत ती 3 राशी.

Shukra Transit 2025: हिंदू धर्मात चैत्र नवरात्री आणि गुढीपाडवा या सणांना विशेष महत्त्व आहे. हे दोन्ही सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेत. ज्योतिषशास्त्रातही या सणांना विशेष महत्त्व आहे. या दिवसात अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसं पाहायला गेलं तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांद्वारे वेळोवेळी राशी बदलत असतात. नवरात्रीच्या आधी शुक्राचा उदय होणार आहे, ज्यामुळे काही राशींना सोन्याचे दिवस येणार आहेत. जाणून घेऊया या राशींबद्दल..
नवरात्रीच्या आधी 3 राशींचे भाग्य उजळणार...!
ज्योतिषशास्त्रानुसार, एखादा ग्रह कोणत्याही राशीमध्ये असण्यासोबतच उदय आणि अस्तावस्थेतही राहतो. नवरात्रीच्या आधी शुक्राच्या गुरूच्या राशीत उदय होईल. पंचांगानुसार, 28 फेब्रुवारी 2025 रोजी धनाचा दाता शुक्राचा मीन राशीत उदय होईल, ज्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. जाणून घेऊया कोणत्या आहेत ती 3 राशी?
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, नवरात्रीच्या आधी वृषभ राशीच्या लोकांवर शुक्र ग्रहाची कृपा असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल. तुमची योजना तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. मान-सन्मानात वाढ होऊ शकते. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. पदोन्नतीची शक्यता आहे.
सिंह
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील. मीन राशीत शुक्राचा उदय शुभ राहील. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते. नोकरदार आणि व्यावसायिकांना फायदा होईल. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकेल.
कुंभ
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील. मतभेद दूर करू शकाल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वादविवादापासून अंतर ठेवा. अनावश्यक तणावापासून दूर राहाल. मन प्रसन्न राहील. खर्च वाढू शकतो. येणारा काळ नवीन संधी आणि फायद्यांचा असेल. विचारात बदल होईल. जीवन आनंदी होईल.
हेही वाचा>>
Trigrahi Yog 2025: टेन्शन सोडा, 'या' 3 राशींसाठी पुढचा आठवडा नशीब पालटणारा! जबरदस्त त्रिग्रही योग मिळवून देणार बक्कळ पैसा, नोकरीत पगारवाढ
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

