Chhagan Bhujbal : देशात महात्मा मोठा की भारतरत्न? छगन भुजबळ यांच्या ओबीसी महामेळाव्यातील वक्तव्याने भुवया उंचावल्या
Jalgaon : महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे, तो टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यावेळी केले.

जळगाव: ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी जळगाव येथे आयोजित अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या ओबीसी महामेळावा संपन्न झाला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ही केवळ एक समाजाची नसून ती समाजातील सर्वच घटकाची आहे. समता परिषदेमध्ये माळी, दलीत, तेली, चांभार, कुंभार, मुस्लिम सर्वच समाजाचे प्रतिनिधी यात आहेत. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) लढाईत समता परिषद मागे हटणार नाही. संविधानाने दिलेल्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी शेवटपर्यंत लढणार, असा निर्धार करत महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याची जबाबदारी आपली आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे, तो टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यावेळी केले.
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले यांना भारत रत्न पुरस्कार द्यावा, म्हणून काही मंडळी मागणी करीत आहेत. त्याला आपला विरोध नाही, मग महात्मा गांधी यांना भारत रत्न का नाही, महात्मा मोठा, की भारतरत्न? असे सांगून, आपला विरोध नसल्याचं भुजबळ यांनी म्हटल आहे. देशात महात्मा किती आहेत? भारतरत्न किती आहेत? आम्हाला महात्मा आणि क्रांतीज्योती हेच शब्द प्रिय आहेत. असेही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यावेळी स्पष्ट केलं.
सगळ्यांना सारखा न्याय द्यायला पाहिजे, मात्र तो मिळत नाही- छगन भुजबळ
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये होणाऱ्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण कमी होत आहे. त्यामुळे आरक्षणाची लढाई संपलेली नाही.आम्ही शेवटपर्यंत लढू आणि ओबीसी घटकाचे आरक्षण कमी होऊ देणार नाही, असे ठाम मत छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले. महात्मा फुले यांचं वाङमय सगळ्यांनी वाचले पाहिजे. आज आपल्या पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या राज्यात काय सुरू आहे, बजेटमधे काय झाले, मी विचारले सगळ्यांना सारखा न्याय द्यायला पाहिजे, मात्र तो मिळत नाही. म्हणून परत परत भांडावे लागते, तुमच् सहकार्य पाहिजे. ते नसेल तर लढायचे कोणासाठी? असा सवाल ही त्यांनी केला.
मला पाडण्यासाठीअनेकांनी प्रयत्न केलेत, मात्र.... - छगन भुजबळ
सारथीला पाचशे कोटी, मग इतरांना कमी मिळायला नको, यासाठी बोलावे लागते. जागृत रहावे लागते, आमदार घाबरतात, निवडणुकीत पराभवाची भीती त्यांना वाटते. मला पाडण्यासाठी प्रयत्न केलेत, मात्र लोकांनी मला निवडून दिलं, हे महत्वाचे आहे. एक दिवस समाज जागृत होईल आणि अन्याय करणाऱ्या विरोधात जागे होतील, असा विश्वासही छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























