एक्स्प्लोर

हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला

हिंजवडी फेज वनमध्ये परिसरात कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली. या घटनेत चालकाच्या पायाखाली अचानक आग लागल्याने चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले.

पुणे : शहरातील हिंजवडी टेम्पो जळीतकांड घटनेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा अपघात नसून घातपात असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासणीतून पुढे आलं आहे. त्यामुळे, टेम्पोमधील कामगारांना जाळून मारण्यात आलं की काय, अशा अनुषंगाने पोलीस अधिक तपास करत होते. अखेर पोलिसांचा संशय खरा ठरला असून ड्रायव्हरनेच टेम्पो जाळल्याची माहिती समोर आली आहे. पुणे (Pune) शहरातील हिंजवडी परिसरामध्ये एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागल्याची घटना काल (बुधवारी, ता-20) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमध्ये कंपनीतील 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर टेम्पो ट्रॅव्हल्स देखील जळून खाक झाली आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 14 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते. सुदैवाने 10 प्रवासी बचावले आहेत. 

हिंजवडी फेज वनमध्ये परिसरात कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली. या घटनेत चालकाच्या पायाखाली अचानक आग लागल्याने चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्यानं ट्रॅव्हल्समधील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतलं आहे. ट्रॅव्हल्सला आग लागली नाही तर चालकानेच गाडी पेटवल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे, चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी अन 5 जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुनाचा गुन्हा दाखल

बस कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन जात असताना अचानकपणे चालकाच्या पायाखाली आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार लॉक झाले, ते न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याचे अगोदर सांगण्यात येत होते. मात्र, आता पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी हत्येचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्याने या घटनेवर हळहळ व्यक्त करणाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, हे सर्व कर्मचारी सकाळच्या शिफ्टला ऑफिसला चालले होते.

4-5 जणांवर होता राग, डीसीपींनी दिली माहिती

हिंजवडीतील टेम्पो जळीतकांडाचा उलगडा झाला असून गाडीचा चालक जनार्दन हंबर्डेकर याने घातपात रचून, आपल्याच कंपनीतून केमिकल आणून त्याच्या ड्रायव्हर सीटखाली ठेवलं होतं. तसेच, कापडाच्या चिंध्याही ठेवण्यात आल्या होता. त्यानुसार, प्लॅन करुन त्याने टेम्पोचा स्फोट घडवून आणला आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे डीसीपी विशाल गायकवाड यांनी दिली. टेम्पोचालकाचा कंपनीतील कर्मचाऱ्यांशी वाद होता. त्याचा पगारही त्याला मिळालेला नव्हता, त्याला ड्रायव्हर व्यतिरिक्त इतर मजुरीची कामे दिली जात होती. त्यातून, त्याचा 4 ते 5 जणांवर राग होता, अशी माहिती गायकवाड यांनी दिली. 

शेवटपर्यंत बसमधून बाहेर येण्याची धडपड

गाडीच्या जळालेल्या लोखंडावर ओरखडे होते. ते शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. कोणीतरी त्या बंद दरवाज्याला ओरबाडून उघडायचा प्रयत्न केला होता. जीवाच्या अकांताने ते दार उघडण्याचा प्रयत्न करत असतील. पण तो दरवाजा उघडला नाही. फुटलेल्या काचांवरही असेच निशाण होते. ते शेवटपर्यंत झगडले होते. या घटनेनंतर त्या जळालेल्या बसच्या कोपऱ्यामध्ये जेवणाचे डबे, जळालेल्या चपला दिसत होत्या. या बसमधील जळालेल्या सीटचा कोळसा झाला आहे. गाडीच्या आतील धातू देखील वितळला आहे.

हेही वाचा

बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gauri Palave Death : लेकींच्या गळ्यात फास, किती सोसायचा त्रास Special Report
KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report
Dharmendra Demise : रोमॅन्टिक हीरो ते बॉलिवूडचा सुपरस्टार..धर्मेंद्र! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
IND vs SA  : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
Embed widget