एक्स्प्लोर
Yuzvendra Chahal Dhanashree Verma Alimony: युजवेंद्र चहलला पत्नीने 60 कोटींची पोटगी मागितली? धनश्री वर्माच्या कुटुंबानी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया
Yuzvendra Chahal Dhanashree Verma Alimony: युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. दोघांनी न्यायालयात सांगितले की, ते गेल्या 18 महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत.

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Alimony
1/8

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा आता एकत्र राहत नाहीत. दोघांचा घटस्फोट झाला आहे. दोघांनी न्यायालयात सांगितले की, ते गेल्या 18 महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत.
2/8

त्यांच्या विभक्त झाल्याची बातमी येताच युजवेंद्र चहलला घटस्फोटानंतर धनश्रीला 60 कोटी रुपये पोटगी द्यावी लागली, असा दावा करण्यात आला.
3/8

या दाव्याबाबत धनश्री वर्माच्या कुटुंबानी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
4/8

केले जाणारे दावे हे खरे नाहीत. धनश्रीच्या कुटुंबातील एका सदस्याने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. धनश्रीच्या कुटुंबातील सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बॉम्बे टाइम्सला मुलाखत दिली.
5/8

त्यामध्ये त्यांनी सांगितले की, पैशांबाबत प्रसारित केल्या जात असलेल्या निराधार दाव्यांमुळे आम्ही संतापलो आहोत. मी स्पष्ट करतो की, आम्ही कधीही युजवेंद्र चहलकडे पोटगी मागितली नाही किंवा त्याने आम्हाला कोणतीही पोटगी देऊ केली नाही. या वृत्तांमध्ये तथ्य नाही.
6/8

60 कोटींच्या पोटगीचा अहवाल आल्यानंतर सोशल मीडियावर लोक संतापले आहेत. ते धनश्रीला वाईटरित्या ट्रोल करत आहेत. कोणी धनश्रीला 'संधीसाधू' तर कोणी तिला 'गोल्ड डिगर' म्हणत आहेत.
7/8

2023 मध्ये युजवेंद्र चहलने त्याच्या सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली होती ज्यामध्ये लिहिले होते, नवीन आयुष्य येत आहे.
8/8

तर धनश्रीने तिचे इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये बदल केले होते. तिने तिचे नाव ‘धनश्री वर्मा चहल’ वरून बदलून ‘धनश्री वर्मा’ केले. तेव्हापासून त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सुरू झाल्या होत्या.
Published at : 21 Feb 2025 04:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
ट्रेडिंग न्यूज
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
