मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिजापूर-दंतेवाडा आणि कांकेर- नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर आज झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 30 नक्षलवाद्यांना ठार (30 Naxalites killed) करण्यात जवानांना यश आले आहे.
गडचिरोली : छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिजापूर-दंतेवाडा आणि कांकेर- नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर आज झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 30 नक्षलवाद्यांना ठार (30 Naxalites killed ) करण्यात जवानांना यश आले आहे. या चकमकीत एक जवान शहीद (one jawan martyred ) झाला आहे. जवानांकडून उशिरापर्यंत शोधमोहीम सुरु असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
जिल्हा राखीव रक्षक दल, विशेष कार्य दल आणि बस्तर फायटर्ससह संयुक्त सुरक्षा दलांनी नक्षल्यांविरोधात अभियान राबविले होते. यात बिजापूर जिल्हा राखीव दलातील एक जवान शहीद झाला. तर दुसरी चकमक कांकेर-नारायणपूर (अबुझमाड) जिल्ह्याच्या सीमाभागात उडाली. यात 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आले. दोन्ही घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, असे छत्तीसगड पोलिसांचे म्हणणे आहे.
यावर्षी आतापर्यंत छत्तीसगडमध्ये 71 नक्षलवादी ठार
दरम्यान, यावर्षी छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. आतापर्यंत छत्तीसगडमध्ये 71 नक्षलवादी ठार झाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, 2024 मध्ये जवानांनी वेगवेगळ्या चकमकीत सुमारे 300 नक्षलवाद्यांना ठार केले आहे, 290 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आज आपल्या जवानांनी ‘नक्षलमुक्त भारत अभियाना’च्या दिशेने आणखी एक मोठे यश मिळवले आहे. मोदी सरकार नक्षलवाद्यांविरोधात निर्दयी दृष्टिकोन ठेवून पुढे जात आहे आणि आत्मसमर्पण करण्यापासून आत्मसात करण्यापर्यंतच्या सर्व सोयी असूनही आत्मसमर्पण न करणाऱ्या नक्षलवाद्यांविरोधात
महत्वाच्या बातम्या:
Chhattisgarh Naxal Encounter : बस्तरमध्ये दोन चकमकीत 24 नक्षलींचा खात्मा; विजापूरमध्ये 20, कांकेर चकमकीत 4 मृतदेह आणि शस्त्रे जप्त, एक जवान शहीद
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

