पतंजलीच्या किडनीवरील औषधाने मिळवली आंतरराष्ट्रीय शोध सूचित जागा; वैज्ञानिक मान्यतेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल,पतंजलीचा दावा
2024 च्या संशोधनातील टॉप 100 शोधांमध्ये या शोधाला स्थान मिळाल्या असल्याचा पतंजलीचा दावा आहे .रिनोग्रीट असे या औषधाचे नाव आहे .

Patanjali News: आयुर्वेदिक उत्पादने आणि नैसर्गिक औषधांना प्रोत्साहन देणाऱ्या बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने मूत्रपिंडीवरील विकसित केलेल्या एका औषधाने आंतरराष्ट्रीय पातळीवर वैज्ञानिक मान्यता मिळवण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल टाकले आहे . किडनीवर तयार केलेल्या पतंजलीच्या औषधाचा शोध प्रबंध नेचर पोर्टफोलिओ या संशोधन अहवालात प्रकाशित करण्यात आले असल्याचं पतंजलीने सांगितले .2024 च्या संशोधनातील टॉप 100 शोधांमध्ये या शोधाला स्थान मिळाल्या असल्याचा पतंजलीचा दावा आहे .रिनोग्रीट असे या औषधाचे नाव आहे . (Patanjali Kidney Medice)
पतंजलीनं काय म्हटलंय?
पतंजलीनं असं म्हटलं की संशोधनाचा scientific report मध्ये प्रकाशित झालेला रिनोग्रेट चा शोध प्रबंध आतापर्यंत 2568 वेळा डाउनलोड करण्यात आला आहे .पतंजलीनं सांगितलं,यावरून हे कळते की आयुर्वेदिक औषध ही केवळ आजारावर प्रभावी इलाज करण्यासाठीच नाही तर वैज्ञानिकांमध्येही जिज्ञासेचा विषय ठरत आहे . Scientific reports चा impact factor 3.8 एवढा आहे तसेच जगातील सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या जर्नलपैकी हे पाचवे जर्नल आहे .असे सांगितले जाते .
आयुर्वेदिक औषधे केवळ रोगाला दूर करण्यासाठी प्रमाणित होत असल्याचं पतंजलीने सांगितले .एवढेच नाही तर वैज्ञानिकही विचार करण्यास भाग पडले आहेत अशाप्रकारे औषधी मुळ्यांपासून बनवली गेलेली कोणतीही औषधे मोठ्या मोठ्या आजारांना दूर करण्यास सक्षम आहेत .पतंजलीने तयार केलेले हे औषध केवळ कॅन्सरच्या आजारासाठीच नाही तर ऍलोपथी औषध Cisplatin ने खराब झालेल्या किडनीलाही ठीक करते .किडनीवर आलेल्या oxidative stress ला कमी करते असा पतंजलीचा दावा आहे .
वैज्ञानिक दृष्टीने मान्यता देण्यासाठी मोठे पाऊल:आचार्य बाळकृष्ण
योग गुरु बाबा रामदेव यांचे जवळचे स्नेही आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड चे सहसंस्थापक आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले,"रिनोग्रेटची ही यशस्वी कामगिरी आयुर्वेदाला वैज्ञानिक दृष्टीने मान्यता देण्यासाठी मोठे पाऊल आहे .जेव्हा प्राचीन भारतीय विज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोबत पडताळले जाते तेव्हा त्याचे अद्भुत परिणाम समोर येतात .असे आचार्य बाळकृष्ण म्हणाले .
हेही वाचा:
तुमच्या दिवसाची सुरुवात भोपळ्याच्या बियांनी करा, जाणून घ्या या बियाण्याचे फायदे!
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

