एक्स्प्लोर

रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल

Sushant Singh Rajput Death Case : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीवर संशय व्यक्त करण्यात येत होता. सीबीआयने तिला क्लीन चिट दिली आहे. 

Sushant Singh Rajput Case : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. सुशांत सिंहचा मृत्यू ही आत्महत्याच असल्याचं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणात जिच्यावर संशय होता त्या रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty ) क्लीन चिट मिळाली आहे. सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. 

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू प्रथमदर्शनी आत्महत्येचे प्रकरण वाटत असले तरी नंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयच्या अंतिम अहवालात मृत्यूचे खरे कारण आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले.

सुशांत सिंगचे वडील के के सिंह यांनी रिया चक्रवर्ती विरोधात सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला होता. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी कोणताही कट कारस्थान नसल्याचा दावा सीबीआयने केला असून रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना क्लीन चिट दिली आहे.

सीबीआयच्या अहवालात काय म्हटलं आहे?

1. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती, त्याला आत्महत्येसाठी कोणीही जबरदस्ती केली नाही.
2. रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चिट मिळाली.
3. या प्रकरणी कोणताही गुन्हेगारी अँगल किंवा 'फाऊल प्ले' आढळला नाही.
4. AIIMS फॉरेन्सिक टीमनेही हत्येची शक्यता नाकारली.
5. सोशल मीडिया चॅट्स अमेरिकेत पाठवून तपास केला. त्यामध्ये छेडछाड केल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलिस करत होते. त्याचवेळी या प्रकरणी बिहारमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यात अधिकार क्षेत्रावरून वाद निर्माण झाला. बिहार सरकारच्या शिफारशीवरून केंद्र सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय तपासाला मान्यता दिली होती. 19 ऑगस्ट 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्याचे अधिकार दिले होते.

एम्स फॉरेन्सिक अहवालाचा निष्कर्ष 

एम्सच्या फॉरेन्सिक तज्ञांनी विषबाधा आणि गळा आवळून हत्या केल्याची शक्यता नाकारली, सीबीआयने या अहवालाच्या आधारे तपास पूर्ण केला. आता सीबीआयचा अहवाल ग्राह्य धरायचा की अधिक तपास करायचा हे न्यायालय ठरवेल.

सुशांतच्या कुटुंबाकडे कायदेशीर पर्याय काय?

वास्तविक, सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल झाल्यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांसमोर मुंबई कोर्टात निषेध याचिका दाखल करणे हा एकमेव पर्याय उरला आहे. सीबीआयच्या अहवालावर कुटुंबीयांना शंका असल्यास ते न्यायालयात दादही मागू शकतात.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Nabin BJP: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होताच नितीन नबीन यांचे पहिले निर्णय; विनोद तावडे, आशिष शेलारांवर मोठी जबाबदारी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होताच नितीन नबीन यांचे पहिले निर्णय; विनोद तावडे, आशिष शेलारांवर मोठी जबाबदारी
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावला
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावला
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal Buldhana: प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार वादावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
Pratibha Dhanorkar On Vijay Wadettiwar : काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, चंद्रपूरात प्रतिभा धानेकर आणि विजय वडेट्टीवार वाद शिगेला
Gosikhurd Project Special Report गोसेखुर्द काठोकाठ पण 38 वर्षांपासून गावकरी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Naresh Mhaske Coffee with Kaushik : मुंबईत महापौर कुणाचा? खासदार नरेश म्हस्के यांचा खळबळजनक पॉडकास्ट
Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Nabin BJP: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होताच नितीन नबीन यांचे पहिले निर्णय; विनोद तावडे, आशिष शेलारांवर मोठी जबाबदारी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होताच नितीन नबीन यांचे पहिले निर्णय; विनोद तावडे, आशिष शेलारांवर मोठी जबाबदारी
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावला
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावला
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Kalyan Dombivli Mahangarpalika Election 2026: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत चक्रावणारं राजकारण, ठाकरेंचे दोन नगरसेवक गायब, दोन जण मनसेच्या गोटात
कल्याण-डोंबिवलीत चक्रावणारं राजकारण, ठाकरेंचे दोन नगरसेवक गायब, दोन जण मनसेच्या गोटात
Embed widget