Maharashtra Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा
Maharashtra Live blog updates: राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यात नेमकं काय घडतंय? नागपूरमध्ये संचारबंदी शिथील करण्यात आली आहे.
LIVE

Background
दादर कबुतरखाना हटविण्याच्या हालचाली; वरळी किंवा प्रभादेवीत स्थलांतराचा विचार
मुंबई : दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबुतरखाना हटविण्याच्या हालचाली अखेर मुंबई महापालिका स्तरावर सुरू झाल्या आहेत. कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आरोग्यधोक्याच्या तक्रारींमुळे हा कबुतरखाना वरळी अथवा प्रभादेवी येथे स्थलांतरित करण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. यामुळे आता शहरातील इतर कबुतरखाने देखील हटवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होऊ लागली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दादर येथे हा कबुतरखाना असून, येथे कबुतरांची संख्या बेसुमार वाढली आहे. याचा थेट परिणाम स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर होत आहे. घरांच्या खिडक्या, गॅलऱ्यांमध्ये कबुतरांचा वावर वाढला असून, विष्ठेमुळे परिसर अस्वच्छ होत आहे. कपडे सुकविण्यासाठी लावलेल्या दोऱ्यांवरही कबुतरांचा कब्जा असून, नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आंदोलन केले होते. त्यानंतर महापालिकेने या प्रश्नाची दखल घेत पुढील कार्यवाहीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
यासंदर्भात महापालिकेच्या हेरिटेज विभाग, आरोग्य विभाग आणि परिरक्षण विभागाची २५ मार्चला बैठक होणार होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली आहे. तरीही हा कबुतरखाना प्रभादेवीतील कीर्ती महाविद्यालय परिसर किंवा वरळीतील मोकळ्या जागेत हलविण्याचा विचार महापालिका करत आहे. लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
- नाशिक येथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
- देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गळ्यात भगवी शाल घालून पुष्पगुच्छ देऊन सत्कार
- ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन
- शहर विकास तसेच कुंभमेळा संबंधित बैठकांत सर्व पक्षांच्या सदस्यांना सामील करून घ्यावे यासाठी दिले निवेदन
- नाशिक शहरातील विकास कामे आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून ठाकरे गटांने दिला होता फडणवीस यांना नाशिक मध्ये पाय न ठेवू देण्याचा इशारा
- मात्र पोलिसांच्या मदतीने फडणवीसांची भेट घेतल्याची जिल्हाप्रमुखांची माहिती
- आंदोलन न करता भेट घेऊन निवेदन दिले
- मागणी मान्य न केल्यास सर्वसामान्य जनतेला घेऊन आंदोलनाचा इशारा
Kolhapur News: हद्दवाढीवरून महायुतीत दोस्तीत कुस्ती; शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा पाठींबा तर चंद्रदीप नरके यांचा विरोध
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून ग्रामीण विरुद्ध शहरी असा संघर्ष सुरू असताना आता महायुतीतील शिवसेनेचे दोन आमदार एकमेकांच्या समोर आले आहेत... कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शहराच्या हद्दवाढीला समर्थन दिलं आहे.... तर त्याचवेळी करवीरचे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी मात्र शहराच्या हद्दवाढीला कडाडून विरोध केला आहे... आज कोल्हापूर शहरामध्ये हद्दवाढीच्या समर्थनार्थ आणि हद्दवाढीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे.... उद्या याच मुद्द्यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावलेली आहे... या बैठकीमध्ये देखील आपली बाजू ठामपणे मांडण्याचा निर्धार या लोकप्रतिनिधींनी केला आहे... त्यामुळे आत्तापर्यंत गाव पातळीपर्यंत सुरू असलेला हा संघर्ष आता आमदारांच्या संघर्षापर्यंत पोहोचला आहे.....महायुतीतील चंद्रदीप नरके, अमल महाडिक, अशोकराव माने एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर आणि चंद्रकांतदादा पाटील दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे... आता मुंबईत उद्या होणाऱ्या बैठकीत शहराच्या हद्दवाढ संदर्भात आणि प्राधिकरणाच्या संदर्भात कोणता निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे....
Maharashtra News: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील २० टक्के निर्यात शुल्क हटवले; निर्यातीचा मार्ग मोकळा
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्याती वरील २० टक्के निर्यात शुल्क पूर्णपणे हटवले असून, आता कांदा निर्यातीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. राज्यात कांदा पिकाची लागवड जास्त झाली आहे व पोषक हवामान असल्याने उत्पादन जास्त होणार आहे.त्यामुळे कांद्याच्या भावात शेतकऱ्यांची कोंडी होऊ नये म्हणून कांदा पिकावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवले जावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. त्या नुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनात केंद्र सरकारला निर्यात शुल्क हटवण्याच्या बाबत विनंती केली होती. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची मागणी लक्षात हे निर्यात शुल्क पूर्णपणे हटवले आहे. १ एप्रिल २०२५ पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. त्याचबरोबर केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे मंत्री श्री रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित जी शहा, कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांचे आभार मानले.
HSRP: एचएसआरपी नंबर प्लेटसाठी बनावट संकेतस्थळ; सायबर फसवणुकीचा नवा प्रकार उघड
मुंबई : उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसवण्याच्या सरकारच्या निर्देशांचा गैरफायदा घेत सायबर फसवणुकीच्या नव्या प्रकरणांचा उलगडा झाला आहे. आधी बनावट लिंकद्वारे फसवणूक केली जात होती. मात्र, आता सायबर भामट्यांनी थेट सरकारी संकेतस्थळासारखे बनावट संकेतस्थळ तयार केले असून, त्याद्वारे नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे. मुंबई पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनुसार, एचएसआरपी नंबर प्लेटसाठी बनावट लिंकद्वारे फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला होता. सहाय्यक परिवहन आयुक्तांनी ५ मार्च रोजी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर फसवणूक करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र, सायबर गुन्हेगारांनी आता अधिक गंभीर पाऊल उचलत थेट सरकारी संकेतस्थळाच्या नावाशी साधर्म्य असलेले बनावट संकेतस्थळ तयार केले आहे. ‘बुक माय एचएसआरपी डॉट कॉम’ या नावाने हे संकेतस्थळ उभारण्यात आले असून, त्याद्वारे नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत. प्राथमिक तपासणीत हे संकेतस्थळ राजस्थानमधून चालवले जात असल्याचे समोर आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

