Pune Crime News: पुण्यातील आंतरराष्ट्रीय मेफेड्रोन प्रकरणाचा सूत्रधार संदीप धुनिया व्हिएतनाममध्ये? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती, CBIकडूनही समांतर तपास
Pune Crime News: पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुरकुंभ परिसरातील कारखान्यात छापा टाकून पोलिसांनी एक हजार 836 किलो मेफेड्रोन जप्त केले होते. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त केलेल्या मेफेड्रोनची किंमत तीन हजार 674 कोटी रुपये आहे

पुणे: पुणे जिल्ह्यातील कुरकुंभमधून 400 कोटी रुपयांची मेफेड्रोनची तस्करी लंडनमध्ये केलेल्या प्रकरणाचा केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेकडून (सीबीआय) समांतर तपास करण्यात येत आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया व्हिएतनामध्ये वास्तव्यास असल्याची तपास यंत्रणांना माहिती मिळाली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुरकुंभ परिसरातील कारखान्यात छापा टाकून पोलिसांनी एक हजार 836 किलो मेफेड्रोन जप्त केले होते. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त केलेल्या मेफेड्रोनची किंमत तीन हजार 674 कोटी रुपये आहे
कुरकुंभ मेफेड्रोन तस्करी प्रकरणाचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून (एनसीबी) तपास करण्यात येतो आहे. तसेच, ‘सीबीआय’कडून देखील या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. या प्रकरणात दिल्लीतून अटक करण्यात आलेला आरोपी संदीप यादव याने कुरिअरद्वारे 400 कोटी रुपयांचे 218 किलो मेफेड्रोन लंडनला पाठवले होते. संदीप यादव याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
कुरकुंभ येथे असलेल्या कारखान्यात छापा टाकून पोलिसांनी एक हजार 836 किलो मेफेड्रोन जप्त केले होते. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त केलेल्या मेफेड्रोनची किंमत तीन हजार 674 कोटी रुपये आहे. मेफेड्रोन विक्री प्रकरणामध्ये पुणे पोलसांच्या गुन्हे शाखेने सोमवार पेठेतील गुंड वैभव उर्फ पिंट्या माने, हैदर शेख यांना पकडलं होतं. यांच्याकडे केलेल्या चौकशीत मेफेड्रोन कुरकुंभ ओैद्यौगिक वसाहतीतील अर्थकेम लॅबोरटरीजमध्ये तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
त्या ठिकाणावरून दिल्लीसह देशातील वेगवेगळ्या शहरात आणि लंडनमध्ये मेफेड्रोन विक्रीस पाठवण्यात आल्याची माहिती उघडकीस आली होती. मेफेड्रोन तस्करी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया असल्याचे उघडकीस आल्यानंतर तो परदेशात फरार झाला. धुनिया हा व्हिएतनामध्ये वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे.
यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल
संबंधित प्रकरणात गुंड वैभव उर्फ पिंट्या माने, हैदर शेख, अजय करोसिया, भीमाजी साबळे, युवराज भुजबळ, आयूूब मकानदार, संदीपकुमार बसोया, दिवेश भुटानी, संदीप यादव, देवेंद्र यादव, सुनीलचंद्र बम्रन, मोहम्मद कुरेशी, शोएब शेख, सिनथिया उगबाब, अंकिता दास, निशांत मोदी यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

