एक्स्प्लोर
Konkan Fishing : शेपटी विषारी, पण मासा चविष्ट... मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच वागळी मासा सापडल्याने मच्छिमारांच्या आनंदावर विरजण
Konkan Fishing : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले समुद्र किनाऱ्यावर मासेमारी करुन आलेल्या मच्छिमारांच्या जाळ्यात विषारी मासे सापडल्याने मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Vagali Stingray Fish
1/9

राज्यात गेले दोन महिने पावसाळ्यात मासेमारी पूर्णपणे बंद होती. दोन महिन्यानंतर कालपासून तब्बल 61 दिवसांनी मासेमारी हंगाम सुरु झाला.
2/9

मात्र कोकणात मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच मच्छिमारांवर संकट ओढवले आहे.
3/9

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले समुद्र किनाऱ्यावर मासेमारी करुन आलेल्या मच्छिमारांच्या जाळ्यात विषारी मासे सापडल्याने मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
4/9

गेले दोन महिने रोजगाराची संधी नसल्याने घरी बसून असलेले मच्छिमार आता मासेमारी हंगाम सुरु झाल्याने आनंदात होते. मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
5/9

स्थानिक भाषेत वागळी नावाने प्रचलित असलेल्या माशाची शेपटी अत्यंत विषारी असते. शेपटी विषारी पण मासा चविष्ट म्हणून वागळी मासा ओळखला जातो.
6/9

या माशाने जर शेपटीने हल्ला केला तर याचं विष माणसाच्या अंगात गेल्यास माणूस गंभीर आजारी पडू शकतो. रुग्णालयात उपचार घेतल्याशिवाय पर्याय नाही.
7/9

हा मासा खाण्यासाठी चांगला असला तरी या माशांची शेपटी ही विषारी असल्याची माहिती मच्छिमारांनी दिली आहे.
8/9

या माशांची शेपटी तोडून हे मच्छिमार वाळूत पुरुन टाकता. त्यानंतर हा मासा विक्रीसाठी पाठवला जातो.
9/9

मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच वागळी मासा मिळाल्याने मच्छिमार नाराज आणि संभ्रमावस्थेत आहेत.
Published at : 02 Aug 2023 12:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
