एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar Crime News: शरीर सुखाची मागणी, कटरने वार, गोधडीसारखं अंग शिवण्याची वेळ, 280 टाके छ. संभाजीनगरची हादरवणारी घटना

Chhatrapati Sambhajinagar Crime News: भावकीतील एका 19 वर्षीय नराधमाने 36 वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली, तिने नकार दिल्याने तिच्यावरती सपासप वार केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) संतापजनक घटना घडली आहे. भावकीतीलच 36 वर्षांच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली, त्यानंतर 19 वर्षांच्या तरुणाने नकारानंतर तिच्यावरती कटरने वार करत हल्ला केला. त्यामुळे तिला तब्बल 280 टाके घालावे लागले आहेत. अंगावरती झालेल्या भयंकर वेदना सहन करत पिडित महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. अभिषेक तात्याराव नवपुते (वय 19 वर्षे) असं आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावभर काही घडलंच नाही, अशा आविर्भावात वावरत होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा साधा लवलेशही दिसत नव्हता.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना रविवारी घडली आहे. (Chhatrapati Sambhajinagar) 

पिडीतेने सांगितलं नेमकं काय घडलं?

रविवारी (2 तारखेला) दुपारी मी शेतात काम करत असताना आरोपी अभिषेकचा मला फोन आला. तो फोनवरती म्हणाला, एक तर तू माझ्याबरोबर झोप, नाही तर तुझ्या जावेशी माझं जुळवून दे...हे ऐकून मला खूप राग आला. मी फोन कट केला. संध्याकाळी मी शेतातली काम संपवून पांदीच्या रस्त्याने मी एकटीच जात असताना अचानक पाठीमागून येऊन त्याने माझी वेणी खेचली आणि डोकं दगडावर आपटलं. मला काही समजण्या आधी त्याने पहिल्यांदा कटरने माझ्या तोंडावर वार केला. मी ओरडायचा प्रयत्न केला तर त्याने माझ्या गळ्यावरच वार केला. यामध्ये माझे कपडे देखील फाटून गेले. वार केल्यावरती माझं रक्त काही थांबत नव्हतं. त्यातच त्याने मोठा दगड उचलला आणि माझ्या अंगावर मारला. दुसरा दगड माझ्या तोंडावर मारला आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली.

शुद्धीत आले त्यावेळी डोळा उघडत नव्हता. थोड्या वेळानं लक्षात आलं की दोन्ही हाताला सलाइन लावलेलं होतं. मी एक डोळा उघडायचा प्रयत्न केला. पण अंगभर सुरू झालेल्या ठणक्यामुळे डोळ्यातून पाण्याची धार लागली. पाणी जखमेला लागल्यावर तर आग जास्त भडकली, अशी आपबिती पिडितेने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीवेळी सांगितली आहे.

अंगावरती 280 टाके, दोऱ्याचा खर्च 22 हजार

भावकीतीलच 36 वर्षांच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी 19 वर्षांच्या तरुणाने केली. तिने नकार दिला त्याच्या रागातून नराधमाने तिच्या शरीरावर कटरने सपासप वार केले. त्यामुळे तिच्या अंगावर तब्बल 280 टाके घालावे लागलेत. तिच्या मानेपासून ते कमरेपर्यंत सव्वादोन फुटांचा एक वार आहे.  भयंकर वेदना सहन करत ही महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. घरातील परिस्थिती जेमतेम आहे. त्यांना 11 वर्षांची दोन मुलं आहेत. सासरप्रमाणेच त्यांच्या माहेरची परिस्थितीही हलाखीची आहे. पीडितेवर उपचार करण्यासाठी आता जो खर्च येईल त्यासाठी त्यांकडे पुरेसे पैसेही नाहीत. पिडीतेच्या अंगावर 280 टाके पडले आहेत, यासाठी लागणाऱ्या दोऱ्यांचा खर्चच 22 हजार इतका आला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना पिडीतेने ही माहिती दिली आहे.

डॉक्टरला गोधडीवानी माझं अंग शिवावं लागलं

पिडितेने या घटनेबाबत माहिती दिली, तिला होणाऱ्या यातना, शारीरीक आणि मानसिक त्रास हे एकून अंगावर काटा येतो. माझ्यावर त्यानं इतके वार केले आहेत की, डॉक्टरला गोधडीवानी माझं अंग शिवावं लागलं. हे टाके शिवण्यासाठी नुसता दोराच 22 हजार रुपयांचा लागला आहे. एकही अवयव असा नाहीये की जिथे फाडलेलं नाहीये. त्या घावांमुळे सगळ्या अंगातच आगडोंब उठला आहे. या यातना सहन होत नाही, पण रडताही येत नाही. कारण, डोळ्यातून आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमेला लागलं तर आणखीच आग मारते. आता मी करू तरी काय ? असं ती पिडित महिला म्हणते.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Embed widget