एक्स्प्लोर
कोकणातून मुंबईकडे निघालेली 60 प्रवाशांची बस भातशेतीत कोसळली; स्थानिक धावले
गणपती बाप्पांच्या आगमनासाठी गावी गेलेल्या कोकणातील चाकरमान्यांनी आता मुंबईकडे परतीची वाट धरली आहे. कोकणताील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून चाकरमानी राजधानी मुंबईकडे परतत आहेत.

Bus accident in sindhudurg ganesh festival
1/7

गणपती बाप्पांच्या आगमनासाठी गावी गेलेल्या कोकणातील चाकरमान्यांनी आता मुंबईकडे परतीची वाट धरली आहे. कोकणताील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून चाकरमानी राजधानी मुंबईकडे परतत आहेत.
2/7

रेल्वे मार्गे आणि रस्तेमार्गे मुंबईकर पुन्हा गावाकडून कामासाठी मुंबईत येत आहेत. मात्र, रेल्वेत आरक्षण सीट शिल्लक नसल्याने आणि बस व खासगी प्रवासी वाहनांतही गर्दी असल्याने सर्वांची तारांबळ उडत आहेत.
3/7

त्यातच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा येथून मुंबईला जाणारी खासगी बस तुळस येथे समोरील वाहनाला बाजू देताना भातशेतीत कोसळल्याने भीषण अपघाताची घटना घडली.
4/7

तुळस येथे झालेल्या या अपघातात 55 ते 66 प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. समोरील वाहनाला जागा देत असल्याने बसचा वेग कमी होता. त्यामुळे, बस जागेवरच पलटी झाल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
5/7

या अपघातात 7 ते 10 प्रवासी जखमी झाले असून त्यांना वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पूर्ण क्षमतेने प्रवासी घेऊन जाणाऱ्या या खासगी बसचा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
6/7

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरुन सातत्याने कोकणवासी राज्य सरकारला आरसा दाखवतात. तसेच, लांब पल्ल्याच्या या मार्गावरील रस्ता खराब असल्याने त्यांची होणारी तारांबळही सातत्याने पुढे आली आहे.
7/7

दरम्यान, तुळस येथील अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतीचा हात दिला, तसेच जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचार करत धीर देण्याचं काम केलंय.
Published at : 14 Sep 2024 07:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion