महिलांसाठी पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना, भरघोस व्याजासह आंशिक पैसे काढण्याचीही सुविधा
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (Mahila Samman Savings Certificate).
Mahila Samman Savings Certificate : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (Mahila Samman Savings Certificate). पोस्ट ऑफिसच्या या योजनेत (Post Office Scheme) गुंतवणुकीची (Investment) कालमर्यादा 31 मार्च 2025 पर्यंत आहे. आता पोस्ट ऑफिसने या योजनेतून अंशतः पैसे काढण्याची सुविधा सुरू केली आहे. जाणून घेऊयात या योजनेबाबत सविस्तर माहिती.
खात्यातून किती पैसे काढता येतात
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत, खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर आणि मुदतपूर्तीपूर्वी, खातेधारक त्यात जमा केलेल्या रकमेच्या 40 टक्के रक्कम काढू शकेल. ही योजना 1 एप्रिल 2023 रोजी दोन वर्षांसाठी सुरु करण्यात आली होती. उदाहरणार्थ, या खात्यात 30 एप्रिल 2023 पासून केलेली गुंतवणूक 1 मे 2024 पासून अंशतः काढण्यासाठी उपलब्ध आहे. यासह, तुम्ही गुंतवणुकीच्या स्वरुपात काही पैसे तुमच्याकडे ठेवता आणि आवश्यक असल्यास, तुम्ही तुमचे काम पूर्ण करण्यासाठी काही रक्कम काढू शकता.
या योजनेत किती गुंतवणूक करु शकता?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही दोन वर्षांसाठी एक वेळची योजना आहे. यामध्ये गुंतवणुकीसाठी सरकारने अद्याप मुदतवाढ दिलेली नाही. तुम्ही किमान रु. 1,000 ते कमाल रु. 2 लाख गुंतवू शकता. या योजनेत वार्षिक 7.5 टक्के व्याजदर दिला जातो. हे अनेक लहान बचत योजना आणि बँक एफडीपेक्षा वेगळे आहे. यामध्ये प्रत्येक तिमाहीत चक्रवाढ व्याज मिळते.
व्याजावर कर सूट नाही
व्याजाच्या रकमेवर कर भरावा लागतो. यामध्ये, तुम्ही कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळवू शकत नाही, म्हणून बँक खात्यात जमा केलेले व्याजदर आयकर रिटर्नमध्ये 'इतर स्त्रोतांकडून उत्पन्न' अंतर्गत घोषित केले जावेत. 18 वर्षांखालील मुली देखील महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात. त्याची देखभाल पालकांकडून केली जाईल. या योजनेअंतर्गत अंशतः पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध असल्याने, खातेधारक खाते उघडण्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर शिल्लक रकमेच्या 40 टक्क्यांपर्यंत पैसे काढू शकतो. त्यामुळं या योजनेचा लाभ घेणं फायद्याचे ठरते.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
- योग्यरित्या भरलेला अर्ज फॉर्म
- नवीन खातेधारकांसाठी केवायसी फॉर्म
- आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड (कोणतेही केवायसी कागदपत्र)
- ठेव रकमेसह/चेकसह पे-इन-स्लिप
महत्वाच्या बातम्या:


















