Sandeep Deshpande: मनसेचे मिशन महापालिका सुरू, अध्यक्षपद मिळताच संदीप देशपांडेंनी मुंबई महापालिकेसाठी रणशिंग फुंकलं
यात मुंबईच्या शहराध्यक्षपदी संदीप देशपांडे यांचे नियुक्ती करण्यात आल्यानंतर ते बोलत होते, पाडवा मेळाव्याचा मार्गही खूला झाल्याने पाडव्याच्या सभेत राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे

Mumbai:आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मिश्रण मुंबई हाती घेतलीय .रवींद्र नाट्य मंदिरात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत आज ( 23 मार्च) पार पडलेल्या बैठकीत मनसेतील नवीन पदे आणि पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंनी घोषणा केली .यात मुंबई शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे (Sandeep Deshpande )यांची नियुक्ती करण्यात आली आहे .दरम्यान, आजपासून मिशन महापालिका सुरू आल्याचं संदीप देशपांडे म्हणाले . येणाऱ्या सहा महिन्यात तुम्हाला मनसेचे वेगळेपण दिसेल . पालिकेत भ्रष्टाचार आता झाला असे नाही मागच्या 25 वर्षांपासून होतोय .त्यावेळी सहा मारवाडी कंत्राटदार होते .त्यांना टेंडर दिले जायचे .आज भ्रष्टाचारावरून जे ओरडत आहेत त्या आदित्य ठाकरेंना सांगा की हा भ्रष्टाचार आधीही सुरूच होता असा टोला संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) लगावला .
आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेने मोर्चे बांधणीला सुरुवात केल्यानंतर रविवारी रवींद्र नाट्य मंदिरातील महत्त्वाच्या बैठकीत मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या जबाबदाऱ्या राज ठाकरेंनी दिल्या आहेत .यात शहराध्यक्ष तसेच चार शहर उपाध्यक्षांची नियुक्ती त्यांनी केली आहे .यात मुंबईच्या शहराध्यक्षपदी संदीप देशपांडे यांचे नियुक्ती करण्यात आल्यानंतर ते बोलत होते . दरम्यान, पाडवा मेळाव्याचा मार्गही खूला झाल्याने पाडव्याच्या सभेत राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
काय म्हणाले संदीप देशपांडे?
मनसेच्या इतिहासात पहिल्यांदा हे पद तयार केले गेले आहे .आणि त्याची महत्त्वाची जबाबदारी देऊन राज ठाकरेंनी मोठा विश्वास दाखवल्याचं संदीप देशपांडे म्हणाले .आमचे सर्वात पहिले काम असेल मिशन मुंबई . मुंबई महापालिका जोरात आणि जोमात लढवली जाईल .जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणले जातील .मुंबई महापालिकेत मोठा बदल दिसेल .आज पासून मनसे मिशन महापालिका सुरू असेही ते म्हणाले .येणाऱ्या काळात निश्चितपणे चांगले बदल दिसतील .
2 एप्रिलला महापालिकेसाठीचे प्लॅनिंग सांगू :संदीप देशपांडे
मिशन महापालिकेसाठी 2 एप्रिलला पत्रकार परिषद घेऊन त्यात आमचे प्लॅनिंग सांगू असेही संदीप देशपांडे म्हणाले .येणाऱ्या सहा महिन्यात मनसेचे वेगळेपण तुम्हाला दिसेल .गेल्या दोन ते तीन वर्ष काय कामकाज सुरू आहे हे सगळ्यांना माहित आहे त्यावर आम्ही बोलू .असेही त्यांनी सांगितले .दरम्यान मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार होत असल्याची ओरड करणाऱ्या आदित्य ठाकरे यांना सांगा की भ्रष्टाचार आता सुरू आहे पण तो आधीही सुरूच होता असा टोलाही त्यांनी लगावला .भ्रष्टाचार पालिकेत आता झाला असे नाही मागच्या 25 वर्षांपासून होतोय .त्यावेळी सहा मारवाडी कंत्राटदार होते त्यांना टेंडर दिली जायची .त्यामुळे आत्ता भ्रष्टाचार सुरू आहे अशी ओरड करणाऱ्या आदित्य ठाकरे यांना हे सांगा असे संदीप देशपांडे म्हणाले .
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

