Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी नवीन आठवडा आव्हानांचा; एकापाठोपाठ घडतील महत्त्वाच्या घटना, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 24 To 30 March 2025 : नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 24 To 30 March 2025 : मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
धनु रास साप्ताहिक राशीभविष्य (Sagittarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - हा आठवडा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. रिलेशनशिपमध्ये जर सतत वाद होत असतील तर ते वेळीच सोडविण्याचा प्रयत्न करा. तसेच, नात्यात कमिटमेंट फार महत्त्वाची आहे. ती देण्याची तयारी असेल तर प्रेमात पडा. कोणाचीही फसवणूक करु नका.
करिअर (Career) - तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्हाला करिअरच्या अनेक संधी मिळतील. या संधीचा योग्य वेळी लाभ घ्या. वेळेनंतर निर्णय घेतल्यास पश्चाताप होण्याची शक्यता आहे. नवीन स्किल्स शिकण्याचा प्रयत्न करा.
आर्थिक स्थिती (Wealth) - या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. मॅनेजमेंट स्किल्सवर भर द्या. तसेच, पैशांची गुंतवणूक करा. म्हणजे, भविष्यात तुम्हाला उपयोग होईल. विनाकारण पैसे खर्च करु नका.
आरोग्य (Health) - हा आठवडा तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वातावरणातील बदलांमुळे तुमच्या तब्येतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या यासाठी शक्य तितका सकस आहार घ्या. आरोग्याची काळजी घ्या.
मकर रास साप्ताहिक राशीभविष्य (Capricorn Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - रिलेशनशिपच्या बाबतीत तुम्ही सिरीयस असणं गरजेचं आहे. तसेच, जोडीदाराच्या भावनांचा देखील आदर करा. कोणाला गृहीत धरु नका. तसेच, सोशल मीडियाच्या वापरावरुन व्यक्तीला जजही करु नका.
करिअर (Career) - तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी हा आठवडा तुमच्यासाठी फार गरजेचा आहे. या आठवड्यात सहकाऱ्यांचा देखील तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. कामाच्या नवीन जबाबदाऱ्या तुम्ही संयमाने पार पाडाल. भविष्य उज्ज्वल आहे.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिकदृष्ट्या बोलायचं झाल्यास, या आठवड्यात तुमचे खर्च वाढू शकतात. मात्र, उत्पन्नाच्या नवीन संधी तुम्हाला मिळतील. देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असणार आहे.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या दृष्टीने बोलायचं झाल्यास, या आठवड्यात तुम्ही ध्यान किंवा तुमचं आवडीचं काम करण्यासाठी वेळ काढा. यातून तुम्हाला मानसिक आनंद मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

