Nagpur News : बॉलीवूडच्या 'त्या' अभिनेत्यांवर कारवाई होणार, मोठ्या संकटात सापडणार? फडणवीसांच्या जवळच्या आमदाराचं वक्तव्य
Parinay Phuke : बेटिंग ॲप सोबतच बेटिंग ॲपची जाहिरात करणारे सुद्धा दोषी असतील, असे मोठं विधान भाजपचे (BJP) आमदार परिणय फुके (Parinay Phuke) यांनी केलं आहे.

Nagpur News : देशभरात चर्चेत असलेल्या महादेव बेटिंग (Mahadev betting) ॲपप्रकरणात सेलिब्रिटींगसह अनेक बड्या हस्तींची नावे समोर आली आहेत. त्यामुळे, तपास यंत्रणांकडून बारकाईने याप्रकरणाचा तपास होत आहे. अशातच अनेक बेटींग ॲपच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकरण समोर येत आहेत. या प्रकरणाचे राज्यात नव्हे तर देश विदेशात बेटींग ॲपचं कनेक्शन पोहोचलेलं असताना आता थेट विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये ही असे प्रकार उघड होत आहे.
दरम्यान, आता याच मुद्द्यावरून भाजपचे (BJP) आमदार परिणय फुके (Parinay Phuke) यांनी भाष्य करत बेटिंग ॲप सोबतच बेटिंग ॲपची जाहिरात करणारे सुद्धा दोषी असतील, असे मोठं विधान केलं आहे. बेटिंग ॲपची जाहिरात अभिनेते करतात त्यामुळे लोकांचा ही विश्वास बसून लोकांना या ॲपची लत लागते. परिणामी या संदर्भात निर्बंध लागले पाहजे. हा प्रकार रोखण्यासाठी कायदे आले पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई या माध्यमातून झाली पाहिजे. असेही आमदार परिणय फुके म्हणाले.
दरम्यान, अनेक अधिकारी सोशल मीडियावर पोस्ट टाकत स्वतःला ग्लोरीफाय करतात, यामुळे पोलीस असो की जिल्हाधिकारी आम्हीच सर्व्हेसर्वा आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे यावर धोरण यावे यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असेही आमदार परिणय फुके म्हणाले.
लाडक्या बहिणीला 2100 काय 3000 हजार पण देऊ, पण..
लाडक्या बहिणीला 2100 रुपये दिले नाही, असे काही उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले असतील, 36 हजार कोटी लाडक्या बहिणीसाठी दिली आहे. ही योजना सुरू राहणार आहे. यासाठी 2100 काय 3000 हजार पण देऊ, पण थोडा वेळ थांबावे लागेल, फक्त राज्याची परिस्थिती सुधारू द्या. असेही आमदार परिणय फुके म्हणाले.
काँग्रेसने पत गमावली आहे- परिणय फुके
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेसचे अमादर विचारात घेत नसल्यानं ते स्वतः ला लाईमलाईटमध्ये ठेवण्यासाठी काम करत आहेत, म्हणून ते सतत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करत आहेत. किंबहुना काँग्रेसने आता पत गमावली आहे. असा खोचक टोला ही आमदार परिणय फुके (Parinay Phuke) यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना लगावला आहे.
नितीन गडकरी हे स्पष्टवक्ते, मात्र आम्ही जातीयवादी नाही- परिणय फुके
सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही तर पुढारी जातीवादी आहेत. हे पुढारी आपल्या स्वार्थासाठी जात उभी करतात असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काल (22 मार्च) अमरावतीत (Amravati) येथे केलंय. या बाबत आमदार परिणय फुके यांना विचारले असता ते म्हणाले की, गडकरी हे स्पष्टवक्ते आहे. या बाबत त्यांना काही अनुभव असेल म्हणून त्यावर ते बोलले असतील. मात्र, आम्ही जातीयवादी नाही, काही नेते असतील तर ते बोलले असतील. असे स्पष्टीकरण ही फुके यांनी दिलं आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

