भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री, दीपिका-करिना आसपास पण नाहीत, प्रत्येक सिनेमामागे कमावते 30 कोटी, पण गेल्या 6 वर्षात एकही रिलीज नाही
Indias highest paid actress : दीपिका-करिना आसपास पण नाहीत, प्रत्येक सिनेमामागे कमावते 30 कोटी, पण गेल्या 6 वर्षात एकही रिलीज नाही

Indias highest paid actress : बॉलिवूडमधील अभिनेते, अभिनेत्रींचे आणि कलाकारांचे मानधन नेहमी चर्चेचा विषय असते. कलाकार आपले मानधन चलाखीने गुप्त ठेवतात, समोर येऊ देत नाहीत. मात्र कधीकधी त्यांचं मानधन बातम्यांतून समोर येतं किंवा अफवाही पसरवल्या जातात. एकीकडे पुरुष कलाकार किंवा अभिनेते एका सिनेमासाठी 100 कोटींपेक्षा जास्त रक्कम आकारताना दिसत असताना महिला कलाकार देखील मागे राहिलेल्या नाहीत. मीडिया रिपोट्नुसार भारतात प्रत्येक सिनेमामागे 30 कोटींची कमाई करणारी सर्वात महागडी बॉलिवूड अभिनेत्री आहे. मात्र, गेल्या 6 वर्षात तिचा एकही सिनेमा रिलीज झालेला नाही.
View this post on Instagram
भारतात सिनेमासाठी सर्वात जास्त पैसे आकारणारी अभिनेत्री
प्रियांका चोप्रा जवळपास सहा वर्षांनी एसएस राजामौली यांच्या सिनेमातून पुनरागमन करणार आहे. हा सिनेमात महेश बाबू हा मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रियांका दाक्षिणात्य सिनेमात 20 वर्षानंतर पुनरागमन करताना दिसणार आहे. बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, प्रियांकाने या चित्रपटासाठी तब्बल 30 कोटी रुपये घेतले होते. जे एका सिनेमासाठी भारतीय अभिनेत्रीने आतापर्यंत घेतलेले सर्वाधिक मानधन आहे.
दरम्यान, प्रियांकाने एवढी मोठी रक्कम घेणार असल्याचे सांगितल्यामुळेच तिचा सिनेमातील सहभागाबाबत निर्णय घेण्यासाठी मोठा कालावधी लागलाय. प्रियांकाने तिने सांगितलेली रक्कम थोडीही कमी केली नाही. दरम्यान, आम्ही आमचं मानधन कमी का घ्यावं? आमच्या सिनेमांमध्ये पुरुष कलाकारांनाच दुप्पट मानधन का मिळावं? असा सवालही काही अभिनेत्री विचारताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे प्रियांकाने यापूर्वी तिच्या अमेझॉन प्राइम व्हिडिओ शो सिटाडेलसाठी 5 दशलक्ष डॉलर्स (41 कोटींहून अधिक) इतकी रक्कम आकारली होती. परंतु तो शो सहा तासांचा असल्याने त्याची चर्चा देखील झाली होती. SSMB29 साठी प्रियांकाने घेतलेले 30 कोटींचे मानधन कोणत्याही भारतीय चित्रपटातील महिला स्टारने सर्वाधिक घेतलेले मानधन आहे.
प्रियांका इंडियन सिनेमात पुनरागमन करणार
प्रियांकाने 2015 मध्ये हॉलिवूडमध्ये अभिनय करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रियांका चोप्रा भारतीय चित्रपटांमध्ये फारशी दिसली नाही. 2016 मध्ये जय गंगाजल प्रदर्शित झाल्यानंतर ती फक्त एकाच भारतीय चित्रपटात दिसली. सोनाली बोसचा 'द स्काय इज पिंक'2019 मध्ये प्रदर्शित झाला. आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्यासोबतचा तिचा 'ऑल-वुमन रोड ट्रिप' चित्रपट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे तिचा सहा वर्षांत थिएटरमध्ये किंवा ओटीटीमध्ये एकही भारतीय चित्रपट आलेला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
बॉलिवूडचा 'राजा' होण्यापासून छावा फक्त दोन पावलं दूर, नंबर 1 बनण्यासाठी दोन सिनेमे सर करणं बाकी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

