एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार? छगन भुजबळ म्हणाले, 'पंचांग वगैरे बघतो, जळगावमध्ये चांगले ज्योतिषी....'

Chhagan Bhujbal on Ajit Pawar and jayant Patil Meet: छगन भुजबळांना काका-पुतण्या एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी याबाबत उत्तर दिलं आहे.

पुणे: राजकारण काय घडेल याचा काही नेम नसतो. गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल (शनिवारी) पुण्यात भेट झाली. या दोघा नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. यानंतर अजित पवारांनी या भेटीबाबत स्पष्टपणे सांगितलं. मात्र, राजकीय वर्तुळात आता शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? अशी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि नेते जे गेल्या काही महिन्यांपासून नाराज असल्याच्या चर्चा आहेत ते छगन भुजबळ यांनी याबाबत  जळगावात चांगले ज्योतिषी आहेत. त्यांनाच या संदर्भात विचारतो, असं उत्तर छगन भुजबळ यांनी दिलं आहे.

यासंदर्भात पंचांग वगैरे बघतो...

आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सध्या जळगाव दौऱ्यावर आहे. समता परिषदेचा मेळाव्यातून त्यांनी राज्यात शक्तिप्रदर्शन केलं. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानं भुजबळ नाराज आहेत. समता परिषदेतून त्यांनी राज्यासह राष्ट्रीय पातळीवर दौऱ्याचे नियोजन केले आहे. मंत्रिपद न मिळाल्याने डावलले गेलेले छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून पक्षातील कोणाहीपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जास्त संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यांनी पुन्हा शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे. छगन भुजबळांना काका-पुतण्या एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, संदर्भात पंचांग वगैरे बघतो. मी आता जळगावमध्ये आलो आहे. इथं चांगले ज्योतिषी आहेत. त्यांना विचारतो, असं होईल का? असा प्रश्न करतो, असे भुजबळ यांनी म्हटलं आहे.

अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या बंद चर्चेवरही छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील आणि माझीही अनेकदा चर्चा होते. विधानसभेत ते माझ्या बाजूलाच बसतात. आम्ही चर्चा करतो. आव्हाडही माझ्या बाजूलाच असतात. आम्ही अनेक विषयांवर चर्चा करतो. अजितदादा आणि जयंत पाटील यांनी चर्चा केली तर काय बिघडलं? आम्ही शत्रू नाहीत आम्हाला धडा मिळालेला आहे. ते आमच्या विरोधी पक्षात आहेत. त्यांची मते वेगळी आहेत, आमची वेगळी आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील अन् अजितदादांची भेट

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जयंत पाटील यांची भेट झाली. त्यात ऊसशेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधी चर्चा झाली. तिथे अन्य काहीजणही उपस्थित होते. या भेटीत राजकीय चर्चा काहीही झाली नाही. या भेटीचे चुकीचे अर्थ काढू नयेत असं अजित पवारांनी म्हटलं. मात्र, या बैठकीच्या निमित्ताने दोघे जवळ येत असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.

भेटीवरती अजित पवार म्हणाले..

अर्थसंकल्पात कृषी उत्पादन वाढीसाठी केलेल्या तरतुदीसंदर्भात त्यांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी ही बैठक घेतल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर माध्यमांनी काय बातम्या लावाव्यात हा त्यांचा प्रश्न आहे. पण वस्तुस्थिती पाहुन बातम्या द्या. आमची व्हीएसआयची बैठक होती. त्यासाठी मी आणि जयंत पाटील एकत्र आलो होतो, आजच्या व्हीएसआयच्या बैठकीत एआयचा महत्वाचा विषय होता. एआयचा फायदा होतो आहे. एआयचा वापर करणे काळाची गरज आहे. एआयचा वापर करुन ऊसाचे उत्पादन वाढले आहे. आम्ही त्याचा वापर फळबागा आणि इतर पिकांसाठी देखाल करणार आहोत.आजची नेहमीप्रमाणे आमची बैठक होती. या नियामक मंडळात जयंत पाटलांसह अनेक जण आहेत. त्यांनी काही मिटिंग घेतल्या होत्या. एआयचा वापर करून कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासंदर्भात मी अर्थसंकल्पात सांगितलं होतं. त्याकरता 500 कोटींची तरतूद केल्याचंही जाहीर केलं होतं. यावर जयंत पाटलांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. दोन बैठकांमध्ये थोडावेळ होता, म्हणून ती बैठक घेतली. आम्ही नेहमीप्रमाणे जनरल बॉडीला, नियामक मंडळाला येत असतो, काही कमिटीला येत असतो. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून कृषी उत्पादन कसं वाढेल, यासंदर्भातच आज चर्चा झाली. यातून टनेज कसं वाढेल यावर चर्चा झाली. प्रायोगिक तत्वावर केलेल्या कामामुळे टनेज वाढल्याचं लक्षात आलंय. सोयाबीन, कापूससारख्या पिकांसाठी एआयचा वापर करणं काळाची गरज आहे, या बाबी कृषी खात्याने आणि सरकारने मनावर घेतलं आहे, अशी माहिती देखील अजित पवारांनी यावेळी दिली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 02 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 01 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsRaj Thackeray on MNS | पक्ष बांधणीसाठी मनसेची नवी यंत्रणा, अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारीJaykumar Gore on Black Magic | कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाईट होणार नाही-जयकुमार गोरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !  जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !
Nagpur News : बॉलीवूडच्या 'त्या' अभिनेत्यांवर कारवाई होणार, मोठ्या संकटात सापडणार? फडणवीसांच्या जवळच्या आमदाराचं वक्तव्य
बॉलीवूडच्या 'त्या' अभिनेत्यांवर कारवाई होणार, मोठ्या संकटात सापडणार? फडणवीसांच्या जवळच्या आमदाराचं वक्तव्य
इकडं भाजपच्या संकटमोचकांचा मीडियाशी संवाद, तिकडं खुद्द मुख्यमंत्री ताटकळत राहिले उभे, माहिती मिळताच गिरीशभाऊ अक्षरशः धावत निघाले, VIDEO
इकडं भाजपच्या संकटमोचकांचा मीडियाशी संवाद, तिकडं खुद्द मुख्यमंत्री ताटकळत राहिले उभे, माहिती मिळताच गिरीशभाऊ अक्षरशः धावत निघाले, VIDEO
Embed widget