एक्स्प्लोर
मालवण किल्ल्यावर शिवरायांचा नवा पुतळा उभारणीला सुरुवात; आग्र्याहून आणला, 60 फूट उंच, 100 वर्षे टिकणार
मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र, वाऱ्याच्या वेगाने हा पुतळा कोसळला.
Malvan Shivaji maharaj news statue foundation
1/8

मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र, वाऱ्याच्या वेगाने हा पुतळा कोसळला.
2/8

मालवण किल्ल्यावरील पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त झाला. विरोधक आणि शिवप्रेमींनी सरकारला धारेवर धरले. त्यानंतर, येथे नवीन पुतळा उभारण्यात येईल अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली होती. आता, या पुतळा उभारणीला सुरुवात झाली आहे.
3/8

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तळकोकणातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा हजारो वर्षे टिकेल अशा ब्रॉन्झ धातूपासून बनविण्यात आला आहे.
4/8

मोहेंजोदडोच्या काळात बनविलेले ब्रॉन्झ धातूपासून बनविलेल्या वास्तुकला आजही हजारो वर्षापासून जशाच्या तशा टिकून आहेत. म्हणून नव्याने उभारण्यात येणाऱ्या शिवरायांचा पुतळा ब्रॉन्झ धातूपासून बनविण्यात आला आहे.
5/8

शिवरायांचा हा पुतळा आग्रा येथे बनवून पूर्ण झाला असून वेगवेगळ्या सुट्या भागातून हा पूर्णाकृती पुतळा राजकोट किल्ल्यावर आणला जाईल.
6/8

मालवण किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळा उभारणीला आजपासून सुरुवात झाली असून महाराजांचा 60 फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारला जातं आहे. मागील दुर्घटना लक्षात घेता ह्या वेळी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जातं आहे.
7/8

पुतळ्याच्या उभारणीत डुप्लेक्स स्टेनलेस स्टील आणि ब्रॉन्झ धातू वापरला जातोय. त्यामुळे हा पुतळा वर्षानुवर्षे टिकेल असं शिल्पकार अनिल सुतार यांनी सांगितलं आहे.
8/8

पुतळ्याच्या उभारणीला आजपासून सुरुवात होत असून विधिवत पूजा करुन मालवण गडावरील कामाला सुरुवात करण्यात आली. राम सुतार आर्ट क्रियेशन या कंपनीकडून शिवरायांच्या 60 फूट उंच पूर्णाकृती, तलवारधारी पुतळा उभारण्यात येत आहे. 100 वर्षे टिकेल असा हा पुतळा उभारला जात आहे.
Published at : 03 Mar 2025 02:12 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
महाराष्ट्र
मुंबई

















