भान विसरून ती समुद्राकडे पाहत राहिली, पण एका लाटेने होत्याचं नव्हतं झालं; हरिहरेश्वर समुद्राने जिल्हाधिकारी कार्यालयातील महिलेला केलं गिळंकृत
Raigad Woman Death : हरिहरेश्वरच्या समुद्रात बुडालेल्या महिलेला बाहेर काढण्यात आलं पण तिचा जीव वाचवण्यात रेक्स्यू टीमला अपयश आलं नाही.

रायगड: दोन दिवस सलग सुट्टी असल्याने रायगडमधील हरिहरेश्वर येथे फिरण्यासाठी गेलेल्या महिलेचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. एका दगडावर बसून समुद्राकडे पाहत बसलेल्या या महिलेला एका मोठ्या लाटेने समुद्रात नेलं. या महिलेला बाहेर काढून वाचवण्याचा अतोनात प्रयत्न करण्यात आला. पण त्यामध्ये यश आलं नाही. पल्लवी सरोदे असं या मृत महिलेचं नाव असून त्या ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात काम करत होत्या.
याबाबत मिळालेली माहिती अशी, ठाणे जिल्हाधिकारी यांच्या पीए आणि सोबत आठ महिला कर्मचारी या शनिवार-रविवार या सलग सुट्टी असल्याने दक्षिण रायगडमधील श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे फिरण्यासाठी आल्या होत्या. शनिवारी मंदिर परिसर फिरून झाल्यावर रविवारी सकाळी हे कर्मचारी मंदिरात पुन्हा दर्शन घेऊन समुद्राची प्रदक्षिणा मारण्यासाठी निघाल्या.
इतर कर्मचारी प्रदक्षिणा मारत असताना समुद्र किनारी असणाऱ्या दगडावर पल्लवी सरोदे या समुद्राकडे पाहत बसल्या होत्या. मात्र समुद्रातून आलेली एक मोठी लाट पल्लवी यांना समुद्रात घेऊन गेली आणि होत्याच नव्हतं झालं. या प्रवाहात पल्लवी या बुडून मरण पावल्या. यावेळी साळुंखे रेस्क्यू टीमकडून पल्लवी यांना समुद्रातून बाहेर काढण्यात आलं आणि त्यांचा जीव वाचवण्याचा अतोनात प्रयत्न करण्यात आला. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती ठाणे जिल्हाधिकारी यांच्या स्वीय सहाय्यक दिवटे यांनी श्रीवर्धन पोलिस ठाण्यात दिली.
बादलीच्या पाण्यात बुडून चार वर्षाच्या बालिकेचा मृत्यू
अंघोळीच्या बादलीच्या पाण्यात बुडून चार वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या अंबड एमआयडीसी परिसरात घडली आहे. रागिणी मनोज कुमार वनवासी असं त्या मुलीचं नाव आहे. अंघोळीच्या पाण्याच्या बादलीत पडल्याने तिच्या नाकात तोंडात पाणी गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला. श्वास गुदमरल्याने ती बेशुद्ध झाली. तातडीने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

