Maharashtra LIVE Updates: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा, दादरच्या शिवाजी महाराज मैदानात राज ठाकरेंची तोफ धडाडणार
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, बातम्या आणि विविध घटनांचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यात आज नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
पुण्यात घरफोड्या व वाहन चोरी करणारी 'बारक्या टोळी' पोलिसांकडून गजाआड
पुण्यात घरफोड्या व वाहन चोरी करणारी 'बारक्या टोळी' पोलिसांकडून गजाआड
पुणे शहरातील जवळपास सहा वेगवेगळे गुन्हे आणले उघडकिस
पुणे पोलिसांकडून 5 आरोपींना अटक
आरोपींकडून सोन्याच्या दागिन्यांसह चार मोटरसायकल करण्यात आल्या जप्त
10 लाख 32 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तर दोन लाख 40 हजार रुपयांच्या गाड्या करण्यात आल्या जप्त
पृथ्वीराज उर्फ साहिल संतोष आव्हाड, आनंद लोंढे,आर्यन आगलावे,कुलदीप सोनवणे तसेच एका अल्पवयीन तरुणाला पुणे पोलिसांनी केली अटक
एकनाथ खडसेंचा सरकारवर निशाणा, नागपूर दंगल, दिशा सलियान प्रकरणावरून टीका
एकनाथराव खडसे ऑन नागपूर दंगल व्हाया मालेगाव कनेक्शन
नागपूर येथील दंगल प्रकरणाची पोलीस विभागाकडून कसून चौकशी सुरू आहेत. हा प्रसंग संपुर्ण देशाचं लक्ष वेधण्याचं प्रसंग आहे. नागपूर सारख्या शांतताप्रिय शहरात बाहेरून लोक येवून दंगल घडवितात. यात मालेगाव कनेक्शन जर असेल तर मालेगावकडे लक्ष देण्याची गरज आहे. असे कृत्य करणाऱ्यांकडे पोलीसांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ही दंगल पुर्वनियोजित आहे तर सरकार नेमकं काय करत होते?, याकडे अधिक लक्ष दिलं असतं तर ही घटना घडली नसती. सरकार जर सांगत असेल की ही दंगल पूर्वनियोजन आहे, तर हे गृह खात्याचे मोठे अपयश आहे. मोठ्या प्रमाणात ट्रॉली मधून दगड आणले होते जर असं सांगितलं जात आहे तर, गुप्तचर यंत्रणा, स्थानिक पोलीस एलसीबी काय करत होते?, हा मोठा प्रश्न आहे. गृहका त्याने काळजी घेतली असती तर कदाचित या दंगलीची तीव्रता कमी राहिली असती.
एकनाथ खडसे ऑन दिशा सालियन
विधानसभा ही महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी आहे. शेतकऱ्यांचे, नोकरदारांचे, शेतमजूरांचे, मजूरांचे प्रश्न आहेत. राज्यात अनेक चालीरिती संदर्भात उपाययोजनाचे प्रश्न आहेत. महागाईचे विषय आहेत, शेतकरी कर्जमुक्त, विजेचे प्रश्न सोडविण्यासाठी हे अधिवेशन आहे. तुमची उनीधुनी अधिवेशनच्या बाहेर सोडविता आले असतो. मला वाटतं विधासभेचा सर्व सदस्यांनी चिंतन करण्याची गरज आहे. दिशास सालियन आणि औरंगजेब या प्रश्नाऐवजी कितीतरी सामाजीक प्रश्न महत्वाचे आहेत. महिलांचे विषय, शेतकरी आत्महत्या यासह इतर प्रश्नांवर कितीवेळा विधानसभेत चर्चा होते.
एकनाथ खडसे ऑन शेतकरी आत्महत्या
जळगाव जिल्ह्यातील १४ महिन्यांत २०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अगदी २८ दिवसात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जळगाव जिल्हा तसा पाहिला समृध्द आहे असं समजलं जात. अश्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतात याकडे लक्ष वेधण्याची गरज आहे. आज राज्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, दुष्काळाला सामोरं लागत आहे. या प्रश्नांकडे विधानसभेत चर्चा होत आहे. याकडे कुणीही लक्ष देत नाही. मी अनेक वेळा शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेत मांडतो, याला इतरांनी देखील साथ द्यावी, अशी अपेक्षा करतो.
एकनाथ खडसे ऑन शेतकरी भाजीपाला हमी भाव व कायदा
शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकाला व भाजीपाला याला हमी भाव मिळत नाही, यातील भाजीपाला हा लवकर खराब होणारी वस्तू आहे. त्याला वेळेत भाव मिळालं तर ठिक नाहीतर रस्त्यावर फेकावं लागतं. पण सरकारने याची मध्यस्थी केली पाहिजे एका विशिष्ट किंमतीच्या खाली विकता येणार नाही असा कायदा केला पाहिजे. यासाठी आपण सातत्याने विधानसभेत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला आहे.
एकनाथ खडसे ऑन महिलांवरील अत्याचार
अलिकडच्या काळात महाराष्ट्र महिलांवर अत्याचार होत आहे. पोलीस विभागा या प्रकरणाकंडे सजग नाही हे धरणगाव प्रकरणावरून दिसून येत आहे. असे प्रकरण अनेक ठिकाणी होत आहे. असाच प्रकार निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही घडली आहे. अगदी माझ्या नातीसोबत छेडछाडीचा प्रकार घडला आहे. पण पोलीसांनी अद्याप गुन्हेगार पकडण्यात यश आलेले नाही. पोलीस अधिकारी हे हप्ते आणि पैसे वसूल करण्यात व्यस्त आहे. गुन्हगारांवर पोलीसांचा वचक राहिलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
अकृषी कर वसुलीसाठी उप कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाला सील... तहसील प्रशासनाची कारवाई...
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील महावितरणच्या पाच उपकेंद्रांकडे थकला जवळपास १२ लाखांचा अकृषी कर.... तहसील कार्यालयाने महावितरणच्या उप कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाला ठोकले सील.... 24 तास होते सील...धनादेश दिल्यानंतर काढले सील
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथील तहसील कार्यालयाच्या वतीने सध्या अकृषी कर थकबाकीदारांना नोटीस देत सील ठोकण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील महावितरणच्या पाच उपकेंद्रांकडे जवळपास बारा लाख रुपयांचा अकृषी कर थकीत आहे. याचा भरणा महावितरण प्रशासनाने न केल्याने तहसील कार्यालयाच्या वतीने शिरूर अनंतपाळ येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाला सील ठोकण्याची कारवाई …
जनावरांच्या गोठ्याला आग आगीत २२ शेळ्यांसह १५ कोंबड्या जळून खाक
या आगीत १२ लहान मोठी जनावरे जखमी झाले आहेत
कोरावळे तलाठी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे
anchor:- मुरबाड तालुक्यातील कोरावळे गावातील एका शेतकऱ्याच्या जनावराच्या गोठ्याला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत जवळपास २२ शेळ्या आणि १५ कोंबड्या जळून खाक झाल्या
काल रात्री रात्री साडे आठच्या सुमारास पुंडलिक विठ्ठल धुमाळ यांच्या जनावरांच्या गोठ्याला अचानक आग लागली होती
यामध्ये २२ शेळ्या १५ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या तर गोठ्याच्या दुसऱ्या बाजूस असणारे ६ बैल, १ म्हैस, ३ वासरे , १ गाय आगीत होरपळून जखमी झाले आहेत. या दुर्घटने बाबत कोरावळे तलाठी सजाचे तलाठी यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला आहे.
शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी पुंडलीक धुमाळ यांनी केली आहे.
नागपूर मध्ये घडलेल्या दंगलीच्या घटनेनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडमध्ये
नागपूर मध्ये घडलेल्या दंगलीच्या घटनेनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडमध्ये.
मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांकडून मरोळ माफखान नगर परिसरात संवेदनशील भागात मॉकड्रिल आणि रूट मार्च करण्यात आला.
रमजान ईद आणि गुढीपाडवा सणानिमित्ताने मुंबई पोलिसांकडून संवेदनशील भागामध्ये दंगल विरोधी पथकाकडून मॉकड्रिल
मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एमआयडीसी आणि अंधेरी पोलिसांकडून संवेदनशील भाग मरोळ मापखान परिसरात हे मॉकड्रिल पार पडले.
या मॉकड्रिल मध्ये अंधेरी आणि एमआयडीसी पोलिसांचे जवळपास 60 ते 70 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सोबत अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते.
यावेळी दंगल घडल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहचवून परिस्थितीवर कसा पद्धतीने नियंत्रण मिळवता येईल, मॉकड्रिल च्या माध्यमातून पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

