SRH vs RR Score IPL 2025 : सनरायझर्स हैदराबादची धुमधडाक्यात सुरुवात! राजस्थान रॉयल्सचा 44 धावांनी केला पराभव,
आयपीएल 2025चा दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळला गेला.
LIVE

Background
सनरायझर्स हैदराबादची धुमधडाक्यात सुरुवात!
सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2025 च्या हंगामाची सुरुवात राजस्थान रॉयल्सचा 44 धावांनी पराभव करून विजयाने केली. इशान किशन आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादने 20 षटकांत 6 बाद 286 धावा केल्या, जी या स्पर्धेतील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रत्युत्तरादाखल, संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी चांगली भागीदारी केली, पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. राजस्थान संघ निर्धारित षटकांत सहा गडी बाद केवळ 242 धावा करू शकला आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
राजस्थान रॉयल्सचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये, सॅमसननंतर जुरेलही आऊट
सॅमसन बाद झाल्यानंतर काही वेळातच ध्रुव जुरेलही पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. जुरेल आणि सॅमसनने शतकी भागीदारी करून राजस्थानची धुरा सांभाळली होती, पण प्रथम हर्षलने सॅमसनला आऊट केले आणि नंतर अॅडम झम्पाने जुरेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अशाप्रकारे राजस्थानने पाच विकेट गमावल्या आहेत.
SRH vs RR Live Score IPL 2025 : सुरुवातीच्या धक्क्यानंतर सॅमसन-जुरेलची तुफानी फटकेबाजी,
सुरुवातीच्या धक्क्यानंतर संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी राजस्थानची जबाबदारी सांभाळली. सात षटकांच्या अखेरीस राजस्थानने तीन गडी बाद 82 धावा केल्या.
SRH vs RR Live Score IPL 2025 : राजस्थान रॉयल्सला एकाच षटकात दोन धक्के
सिमरनजीत सिंगने एकाच षटकात राजस्थान रॉयल्सला दोन धक्के दिले आहेत. दुसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या सिमरनजीतने प्रथम यशस्वी जैस्वालला बाद केले आणि नंतर कर्णधार रियान परागला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे, दोन षटकांच्या शेवटी राजस्थानने 25 धावांत दोन विकेट गमावल्या आहेत.
SRH vs RR Live Score IPL 2025 : राजस्थानला पहिला धक्का
राजस्थान रॉयल्सला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. यशस्वी जैस्वाल एक धाव करून बाद झाला. सनरायझर्सनी राजस्थानसमोर मोठे लक्ष्य ठेवले आहे, परंतु राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

