एक्स्प्लोर

अजितदादा म्हणाले होते, लाईट बिल आलं तर पवारांची औलाद सांगणार नाही, आता बिलं का आली, कैलास पाटलांचा सवाल

Kailas Patil : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजनेतील शेतकऱ्यांना थकबाकीची बिलं येत असल्याचं पुराव्यासह मांडलं.

मुंबई :  महायुती सरकारनं राज्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरु केली होती. निवडणूक काळात शेतकऱ्यांना खोटी बिलं वाटण्यात आली . निकालानंतर थकबाकीसह बिलं पाठवण्यात आल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी दिली. सरकारच्या या निर्णयामुळं लाखो शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारनं याबाबत स्पष्टता द्यावी, असं कैलास पाटील म्हणाले.   

कैलास पाटील काय म्हणाले?

महायुतीच्या सरकारनं शेतकऱ्यांना शंभर टक्के फसवलं आहे. सरकारनं निवडणूक काळात मतं मिळवण्यासाठी खोटी आश्वासनं दिली. खोटी बिलं वाटली. विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांना झिरो बिल दिलं गेलं. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो पाहायला मिळतात. कैलास पाटील यांनी एका शेतकऱ्याचं वीज बिल दाखवलं, त्याला निवडणुकीपूर्वी झिरो बिल होतं. डिसेंबरचं जे बिल आलं त्यात 1 लाख 12 हजाराच्या थकबाकीसह बिल देण्यात आलं, असं कैलास पाटील म्हणाले. 

एखादा शेतकरी लगेच विश्वास ठेवतो, तुम्ही विधानसभेत घोषणा केली. निवडणुकीपूर्वी घरोघरी जाऊन बिलं वाटली. आता नंतर त्यांना थकबाकीची बिलं येत असतील तर त्यांची भावना काय असेल, असं कैलास पाटील म्हणाले. प्रत्येक शेतकऱ्याला अशीच बिलं येत आहेत. याचं सरकारनं उत्तर द्यावं, असं कैलास पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांना चालू बिल माफ केलंय की थकबाकीसह माफ केलंय, याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे. मागची थकबाकी जर माफ केली असेल तर ही बिलं कशी येत आहेत, असं कैलास पाटील म्हणाले. 

 निवडणुकीनंतर  झिरो बिल ऐवजी शेतकऱ्यांच्या हातात थकीत वीज बिलाचा आकडा आला आहे.  लाखो रुपये थकीत बिल अचानक आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात शेतकऱ्यांचे वीज बिल घेऊन मुद्दा मांडला. थकित वीज बिल न भरल्यास मागेल त्याला सौर पंप योजनेचा लाभ मिळणार नसल्याच शेतकऱ्याला सांगितले जात असल्याचं कैलास पाटील यांचा म्हणणं आहे 

मागील वर्षी  निवडणुकीआधी राज्य सरकारने शेतकऱ्यांना वीज बिल माफ करून झिरो बिल दिले आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. कैलास पाटील यांनी निवडणुकआधी एका शेतकऱ्याला दिलेलं झिरो बिल आणि आता फेब्रुवारी महिन्यातलं बिल एक लाख 12 हजार रुपये आल्याचं दाखवलं. 

अजित पवार यापूर्वी काय म्हणालेले?

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या एका कार्यक्रमात 2 ऑगस्ट 2024 ला माझ्या शेतकऱ्याला मोफत वीज मिळाली पाहिजे. तुम्हाला माहितीये आज साडे सात हॉर्स पॉवर पर्यंत मोफत वीज दिली.पाच वर्षाची ऑर्डर परवा काढली. तीन वर्षांनी पुन्हा आढावा घेणार आहे. माझ्या शेतकऱ्यांनी वीज वापरावी, लाईट बील द्यायचं नाही. विरोधक फेक राजकारण करत आहेत.आम्ही  हे सगळं करतोय समाजाच्या भल्यासाठी करतोय. एवढी चांगली वीज माफीची योजना विरोधक म्हणतात हा निवडणुका जवळ आल्या म्हणून चुनावी जुमला, चुनावी जुमला, अरं कशाचा चुनावी जुमला..आम्ही शब्दाचे पक्के आहोत ना, आम्हाला लोकांनी आशीर्वाद द्यावेत, पुढं पाच वर्ष वीज माफी नाही ठेवली तर पवारांची औलाद सांगायचो नाही, असं अजित पवार म्हणाले होते.

इतर बातम्या :

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयेच मिळणार, 2100 रुपयांसाठीचं वेटिंग वाढलं, कारण...

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

उबाठा संपवण्याचा विडा संजय राऊतांनी उचललाय, आम्हाला धमक्या देण्यापेक्षा आपलं घर संभाळा, प्रतापराव जाधवांचा हल्लाबोल
उबाठा संपवण्याचा विडा संजय राऊतांनी उचललाय, आम्हाला धमक्या देण्यापेक्षा आपलं घर संभाळा, प्रतापराव जाधवांचा हल्लाबोल
Rajabhau Waje : '…अन् भर पत्रकार परिषदेत खासदार वाजेंच्या डोळ्यात आलं पाणी'; निष्ठेवरून संजय राऊतांकडून तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?
'…अन् भर पत्रकार परिषदेत खासदार वाजेंच्या डोळ्यात आलं पाणी'; निष्ठेवरून संजय राऊतांकडून तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?
Anjali Damania On Operation Tiger: एकनाथ शिंदेंचा वापर होतोय; 'ऑपरेशन टायगर' भाजपचंच षडयंत्र; 6 खासदारांपैकी एकाला मंत्रीपद अन् 100 कोटींची ऑफर; अंजली दमानियांचा दावा
एकनाथ शिंदेंचा वापर होतोय; 'ऑपरेशन टायगर' भाजपचंच षडयंत्र; 6 खासदारांपैकी एकाला मंत्रीपद अन् 100 कोटींची ऑफर; अंजली दमानियांचा दावा
Sanjay Raut : गुजरातचे दोन व्यापारी जोपर्यंत सत्तेत तोपर्यंत चोऱ्या-माऱ्या, लबाड्या होतच राहतील; ऑपरेशन टायगरवरुन संजय राऊतांची बोचरी टीका
गुजरातचे दोन व्यापारी जोपर्यंत सत्तेत तोपर्यंत चोऱ्या-माऱ्या, लबाड्या होतच राहतील; ऑपरेशन टायगरवरुन संजय राऊतांची बोचरी टीका

व्हिडीओ

Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या ब्रिजवर भीषण अपघात; कारवर चढली फॉर्च्यूनर, 4 गाड्या एकमेकांना धडकल्या
मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या ब्रिजवर भीषण अपघात; कारवर चढली फॉर्च्यूनर, 4 गाड्या एकमेकांना धडकल्या
Anjali Damania: 'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
Kolhapur News: 'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
Operation Tiger UBT Shivsena: एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, आता ठाकरेंची आमदारांबाबत धाकधूक वाढली, 20 आमदार कोण?
एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, आता ठाकरेंची आमदारांबाबत धाकधूक वाढली, 20 आमदार कोण?
Omraje Nimbalkar: पुण्यातून ओमराजेंच्या 'मातोश्री' म्हणाल्या; रात्री घरीच होते, सकाळी जीमला जातो म्हणून घराबाहेर गेले
पुण्यातून ओमराजेंच्या 'मातोश्री' म्हणाल्या; रात्री घरीच होते, सकाळी जीमला जातो म्हणून घराबाहेर गेले
खासदार फुटीनंतर गुवाहटीवरुन परतलेल्या ठाकरेंच्या निष्ठावंत आमदारांची प्रतिक्रिया, कैलास पाटील अन् नितीन देशमुख म्हणाले...
खासदार फुटीनंतर गुवाहटीवरुन परतलेल्या ठाकरेंच्या निष्ठावंत आमदारांची प्रतिक्रिया, कैलास पाटील अन् नितीन देशमुख म्हणाले...
Ravi Rana on Opearation Tiger UBT: सहा खासदार फुटताच रवी राणांनी उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले,
सहा खासदार फुटताच रवी राणांनी उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, "आणखी दोघे माझ्या संपर्कात"
Shivsena case in Supreme Court: गेली 3 वर्षे 10 महिने अन् 28 दिवसांपासून ठाकरेंची गल्ली ते दिल्ली न्यायासाठी फरफट; अजूनही तारीख पे तारीख सुरुच असताना पक्ष पुन्हा फोडला
गेली 3 वर्षे 10 महिने अन् 28 दिवसांपासून ठाकरेंची गल्ली ते दिल्ली न्यायासाठी फरफट; अजूनही तारीख पे तारीख सुरुच असताना पक्ष पुन्हा फोडला
Embed widget