Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींसाठी पुढचा आठवडा महत्त्वाचा, ग्रहांच्या संक्रमणामुळे आयुष्यावर होणार 'असा' परिणाम, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 24 To 30 March 2025 : हा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 24 To 30 March 2025 : मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. मात्र, कुंभ आणि मीन राशींसाठी हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण, या आठवड्यात शनीचा कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे कुंभ आणि मीन राशींच्या जीवनात कोणकोणते बदल घडतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
कुंभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Aquarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - जर तुम्ही एका रिलेशनशिपमध्ये आहात तर तुमच्या पार्टनरबरोबरसंवाद साधायला शिका. तसेच, एकमेकांना करिअरसाठी मोटिव्हेट करा. यामुळे तुमचं नातं अधिक खुलेल. नात्यात ऐकण्याची देखील क्षमता ठेवा.
करिअर (Carrer) - करिअरच्या बाबतीत तुम्ही आशावादी राहाल. तसेच, तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्याच्या संधी मिळतील. या संधीचा योग्य वेळी लाभ घ्या. तरुण वर्गातील मुलांना करिअरच्या निमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळेल.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक दृष्टीकोनातून तुम्ही सकारात्मक असाल. पैसे खर्च करण्यापेक्षा ते साठवण्याकडे तुमचा जास्त कल असेल. तसेच, आयुष्यात स्थैर्य हवं असल्यास तुमचे आधी गोल्स निश्चित करणं गरजेचं आहे.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या दृष्टीने बोलायचं झाल्यास, हा आठवडा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात तमावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुमच्या आवडत्या गोष्टीत मन रमवण्याचा प्रयत्न करा.
मीन रास साप्ताहिक राशीभविष्य (Pisces Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - तुमच्या नात्यात विश्वास आणि प्रेम असणं गरजेचं आहे. यासाठी तुमच्या पार्टनरशी संवाद साधा. तसेच, नात्यासाठी थोडा वेळ देणं गरजेचं आहे. तुमच्या भावना मनमोकळ्यापणाने व्यक्त करा.
करिअर (Career) - टीमवर्कमध्ये काम करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. तसेच, सहकाऱ्यांच्या मदतीने तुमच्या करिअरमध्ये चांगली ग्रोथ झालेली दिसणार आहे. त्यामुळे तुमचं नेटवर्किंग स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा.
स्थिती (Wealth) - आर्थिकदृष्ट्या बोलायचं झाल्यास, तुम्ही विचारपूर्वक पैसे खर्च करणं गरजेचं आहे. पैसे गुंतवण्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला देखील घेऊ शकता. तसेच, इतरांना पैसे उधारी देऊ नका.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत सतर्क असण्याची गरज आहे. ग्रहांच्या संक्रमणामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा. हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

