एक्स्प्लोर
Tesla : टेस्लाचं भारतातील पहिलं शोरुम मुंबईत सुरु होणार, बीकेसीतील जागेचं महिन्याला 35 लाख रुपये भाडं अन् 2 कोटी डिपॉझिट
Tesla In India : अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांच्या टेस्ला या कंपनीचं पहिल शोरुम भारतात सुरु होणार आहे. कंपनी मुंबईनंतर नवी दिल्लीत देखील शोरुम उघडण्यासाठी जागा शोधत आहे.
टेस्लाचं मुंबईत शोरुम, दरमहा भाडं किती?
1/5

अमेरिकन उद्योजक एलन मस्क यांच्या टेस्ला इंक कंपनीचं भारताली पहिलं शोरुम मुंबईत सुरु होणार आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये शोरुम भाड्यानं घेतलं आहे.
2/5

कंपनीनं हे शोरुम 881 रुपये प्रति स्केअर फुट इतकं भाडे देऊन भाडेतत्वावर घेतलं आहे. देशातील सर्वात महागडा भाडेकरार मानला जात आहे. कंपनीनं 2 नॉर्थ अवेन्यू, मेकर मॅक्सिटी, ग्राऊंड फ्लोअर, यूनिट जी-1बी साठी भाडेकरारावर स्वाक्षरी केली आहे.
3/5

27 फेब्रुवारीला हा भाडेकरार निश्चित झाला असून टेस्ला इंडियानं यासाठी 2.11 कोटींचं सिक्युरिटी डिपॉजिट जमा केलं आहे. कंपनीला दरमहा 35.26 लाख रुपये भाडं द्यावं लागेल. दरवर्षी यामध्ये 5 टक्के वाढ होईल.
4/5

टेस्लानं भारतातील इलेक्ट्रिक कारची वाढती मागणी पाहता कंपनीनं 5 वर्षांचा भाडेकरार केला आहे. टेस्लाचे प्रमुख एलन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात 13 फेब्रुवारीला भेट झाली होती. त्यानंतर टेस्लानं 20 नोकऱ्यांसाठी भरती काढली होती. 15 जागा मुंबई,15 जागा पुण्यात असतील. कंपनी दिल्लीत देखील जागा शोधत आहे.
5/5

भाडे कराराच्या प्रमुख गोष्टी टेस्लाचा भाडेकरार 5 वर्षांसाठी असेल. 16 फेब्रुवारी 2025 पासून भाडेकरार कालावधी सुरु झाला आहे. 16 फेब्रुवारी ते 31 मार्च 2025 पर्यंतच्या काळात भाडं आकारलं जाणार नाही. दरमहा भाड 35 लाख 26 हजार 665 रुपये द्यावं लागेल. सुरक्षा ठेव म्हणून 2,11,59,9990 (2.11) कोटी रुपये भरले.
Published at : 06 Mar 2025 11:55 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























