जर पायलट नाही तर विमानात कशाला बसवता? तासभर ताटकळल्यानंतर डेव्हिड वॉर्नर रागाने लाल, सुप्रिया सुळेंनीही व्यक्त केला संताप
David Warner on air india : जर पायलट नाही तर विमानात कशाला बसवता? तासभर ताटकाळत ठेवल्यानंतर डेव्हिड वॉर्नर भडकला

David Warner on air india : सध्या एअर इंडियाची विमानसेवा देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी खेळाडू डेव्हिड वॉर्नर याने एअर इंडियाच्या विमानसेवेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. डेव्हिड वॉर्नरने x या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
@airindia we’ve boarded a plane with no pilots and waiting on the plane for hours. Why would you board passengers knowing that you have no pilots for the flight? 🤦♂️🤦♂️
— David Warner (@davidwarner31) March 22, 2025
डेव्हिड वॉर्नरने X वरुन व्यक्त केला संताप
डेव्हिड वॉर्नरने X वर लिहिले की, “@Air India, आम्ही पायलट नसताना विमानात बसलो आहोत आणि तासाभरापासून वाट पाहात आहोत. जर पायलट नाही तर प्रवाशांना विमानात कशाला बसवता?", असे सवाल डेव्हिड वॉर्नरने उपस्थित केले आहेत. त्यानंतर त्याच्या या पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय. अनेक सोशल मीडियावरील युजर्सने एअर इंडियाच्या सुविधेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
I was travelling on Air India flight AI0508, which was delayed by 1 hour and 19 minutes — part of a continuous trend of delays affecting passengers. This is unacceptable.
— Supriya Sule (@supriya_sule) March 21, 2025
Urging Hon’ble Civil Aviation Minister @RamMNK to enforce stricter regulations to hold airlines like… https://t.co/ydqw9NJzcR
सुप्रिया सुळेंनीही व्यक्त केली नाराजी
दरम्यान, एक दिवस अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील एअर इंडियाच्या सुविधेबाबत नाराजी व्यक्त केली होती. कारण फ्लाइटने AI0508 ही 1 तास 19 मिनीटे उशीराने उड्डाण केले होते. सुप्रिया सुळे यांनी X प्लॅट फॉर्मवर लिहिलं की, एअर इंडियाच्या अशा सुविधेमुळे प्रवाशांना सातत्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हे योग्य नाही. मी नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांना विनंती करते की त्यांनी विमान कंपन्यांना जबाबदार धरण्यासाठी कठोर नियम लागू करावेत.
विमान उशीरा उड्डाण घेत असल्याने अनेक प्रवाशांनी तक्रारीचा पाढा वाचला. दरम्यान, तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर एअर इंडियाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. काही तांत्रिक समस्या असल्याने उशीर होत असल्याचं एअर इंडियाकडून सांगण्यात आलं. मात्र, एअर इंडियाच्या सेवेवर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही फ्लाइटमधील “अनकन्फोर्टेबल” जागांवरून एअरलाइनला झापलं होतं. त्यानंतर एअर इंडियाने माफी मागितली आणि प्रवाशांचा अनुभव सुधारण्याचे आश्वासन दिले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
बेल्स उडाल्या, लाईट लागली; तरीही पंचांनी सुनील नरेनला 'हिट विकेट' आऊट का दिलं नाही? नियम काय सांगतो?




















