एक्स्प्लोर
Non Veg Plant: सिंधुदुर्गात सापडली दुर्मिळ 'मांसाहारी' वनस्पती, PHOTO पाहून व्हाल अवाक
sindhudurg plant species: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी खोऱ्यात असणाऱ्या केरे गावात कीटकभक्षी (मांसाहारी) प्रजातीची वनस्पती आढळली आहे. ही दुर्मिळ वनस्पती दलदलीच्या किंवा वाळवंटी भागात सापडते.
Non veg plant
1/5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील केर गावात कीटकभक्षी असणाऱ्या वनस्पतींच्या प्रजातीतील 'ड्रोसेरा बर्मानी' ही कीटकभक्षी (मांसाहारी) वनस्पती आढळली आहे. त्यामुळे येथील जैवविविधतेचे वैभव अधोरेखित झाले आहे. निसर्ग अभ्यासक तुषार देसाई हे पक्षी निरीक्षणासाठी फिरत असताना या दुर्मीळ वनस्पतीचे दर्शन त्यांना झाले.
2/5

दुर्मिळ 'ड्रोसेरा बर्मानी' कीटकभक्षी वनस्पतीचा उपयोग हर्बल औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. वनस्पती स्वतःचे अन्न हरितद्रव्याच्या सहाय्याने तयार करतात. परंतु काही वनस्पतींना पूरक अन्नाची गरज असते आणि ते अन्न काही वनस्पतींना कीटक वा अन्य प्राण्यांना पकडून त्यांच्या शरीरातून मिळवावे लागते.
Published at : 18 Feb 2025 12:42 PM (IST)
आणखी पाहा























