एक्स्प्लोर
नॉनव्हेज अन् दारु सोडण्यासाठी पतीची जबरदस्ती, प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीलाच दिला घटस्फोट
Bollywood Actress Life Story : 'फॅब्युलस लाइव्स वर्सेज बॉलिवुड वाइव्स' या कार्यक्रमात एका अभिनेत्रीने खुलासा करताना सांगितलं की, तिच्या पतीने तिला दारु आणि मांसाहार सोडण्यास सांगितलं होतं.

Bollywood Actress Life Story
1/10

Bollywood Kissa : बॉलिवूड सेलिब्रिटींचं आयुष्य कायमच चर्चेत असतं. सेलिब्रिटी कपलमधील काही टिकतात, तर काही संसाराच्या अर्धा रस्त्यातच एकमेकांचा हात सोडतात.
2/10

सेलिब्रिटींच्या घटस्फोटाच्या बातम्या अनेक वेळा समोर येत असतात. कधी घटस्फोटाची कारणे समोर येतात, तर कधी ती गुलदस्त्यातच असतात. अशाच अका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या घटस्फोटाचं कारण सांगितलं आहे.
3/10

प्रसिद्ध अभिनेत्री नीलम कोठारी हिने 80 आणि 90 च्या दशकातील काळ गाजवला आहे. अभिनेत्री नीलमने अलिकडे एका कार्यक्रमात तिचं पहिलं लग्न आणि घटस्फोटाबाबत सांगितलं. यावेळी ति म्हणाली की, नॉनव्हेज अन् दारु सोडण्यासाठी तिच्या पहिल्या पतीने तिच्यावर सक्ती केली होती.
4/10

'फॅब्युलस लाइव्स वर्सेज बॉलिवुड वाइव्स' या कार्यक्रमात अभिनेत्री नीलम कोठारी हिने पहिल्यांदाच तिचा एक्स-हसबंड ऋषि सेठिया याच्याबाबत चर्चा केली.
5/10

पहिल्या लग्नाबद्दल सांगताना नीलमला अश्रू अनावर झाले आणि ती रडायला लागली. नीलमने सांगितलं की, तिच्या पहिल्या पतीने तिच्या अनेक गोष्टी बदलायला सांगितल्या.
6/10

नीलम म्हणाली, सुरुवातीला मलाही यात काही अडचण नव्हती. मला माझं नाव बदलण्यास सांगितलं, मी ते मान्य केलं. अनेक महिला लग्नानंतर नाव बदलतात, हा विचार करून मी स्वतःला धीर दिला.
7/10

त्याने मला दारू पिणे बंद करण्यास सांगितलं. मी मांसाहार सोडण्याची सक्ती केली. मग मला वाटलं की, हे आता खूप जास्त होत आहे. मी स्वतःला विचारलं की, मी काय करत आहे. हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न होता. मी याला नकार दिला. अखेर नीलमने ऋषी सेठियाशी घटस्फोट घेतला.
8/10

अभिनेत्री नीलम कोठारीने 1980 आणि 90 च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले आहेत. फॅब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलीवूड वाइव्हज या सीरिजमध्ये ती अलिकडे दिसली.
9/10

ऑक्टोबर 2000 मध्ये, नीलमने लंडनस्थित उद्योगपती निर्मल सेठिया यांचा मुलगा ऋषी सेठियाशी लग्न केलं होतं, पण लवकरच ते विभक्त झाले.
10/10

नीलम पुन्हा समीर सोनीच्या प्रेमात पडली आणि 2011 मध्ये त्यांनी लग्न केलं. 2013 मध्ये त्यांनी आहाना नावाची मुलगी दत्तक घेतली.
Published at : 22 Dec 2024 01:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
