Bell's Palsy and Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना झालेला 'Bell's Palsy' हा आजार नेमका काय आहे?
Bell's Palsy and Dhananjay Munde, Mumbai : धनंजय मुंडेंना झालेला 'Bell's Palsy' हा आजार नेमका काय आहे?

Bell's Palsy and Dhananjay Munde, Mumbai : मंत्री धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर काही दिवसांपूर्वीचं शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता त्यांना नव्या आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन धनंजय मुंडे यांनी Bell's Palsy हा आजार झाला असल्याचं सांगितलं आहे. "मला Bell's palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही", अशा आशयाची पोस्ट धनंजय मुंडे यांनी केली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांना झालेला 'Bell's Palsy' हा आजार नेमका काय आहे? जाणून घेऊयात..
माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 20, 2025
त्याच दरम्यान मला…
बेल्स पाल्सी म्हणजे काय? (What is Bell's Palsy)
"बेल्स पाल्सी" ही एक मेंदूशी संबंधित म्हणजेच न्यूरोलॉजिकल समस्या आहे, ज्यामध्ये चेहऱ्याची नस (फेशियल नर्व) कमजोर होते किंवा प्रभावित होते, त्यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूला तात्पुरता लकवा सदृश्य स्थिती निर्माण होते.
बेल्स पाल्सीची लक्षणे:
- चेहऱ्याच्या एका बाजूला कमजोरी किंवा लकवा
- डोळे आणि तोंड व्यवस्थित बंद न करता येणे
- बोलताना किंवा खाताना अडचण येणे
- चेहऱ्यावर मुंग्या येणे किंवा सुन्न वाटणे
- चव जाणवण्यात अडचण
- कानाजवळ वेदना किंवा संवेदनशीलता वाढणे
बेल्स पाल्सीची कारणे:
व्हायरस संसर्ग (जसे की हर्पीस व्हायरस)
अचानक थंडी लागणे किंवा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे
जास्त तणाव किंवा मानसिक दडपण
मधुमेह (डायबिटीज) किंवा इतर काही आरोग्य समस्या
उपचार आणि काळजी:
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्टेरॉइड किंवा अँटीवायरल औषधे घेणे
फिजिओथेरपी आणि चेहऱ्याच्या हालचालींशी संबंधित व्यायाम करणे
प्रभावित भागावर मालिश आणि गरम पाण्याने शेक करणे
डोळे कोरडे पडू नयेत म्हणून आई ड्रॉप्स वापरणे
बहुतांश प्रकरणांमध्ये बेल्स पाल्सी काही आठवड्यांत किंवा महिन्यांत आपोआप बरी होते.
मात्र, लक्षणे जास्त काळ टिकून राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
