एक्स्प्लोर

Thackeray UBT: 'त्यांच्या वाढदिवसादिवशी खाणं, पिणं, मंडप, सर्व खर्च अन् साड्या आमच्याकडून घेत...',नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठाकरे गटाच्या महिला आक्रमक, केले मोठे आरोप

Thackeray UBT on Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात पुण्यात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं दिसून आलं. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील घराबाहेर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आंदोलन केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मोठे आरोप देखील केले आहेत.

पुणे: दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. मराठी साहित्य संमेलनामध्ये 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत पार पडली. मुलाखतीवेळी नीलम गोऱ्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असं खळबळजनक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या या मोठ्या दाव्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात पुण्यात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं दिसून आलं. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील घराबाहेर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आंदोलन केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मोठे आरोप देखील केले आहेत.

नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरें यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. ठाकरे यांच्या पक्षातील महिला शिवसैनिकांनी नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर आंदोलन केलं आहे. दिल्लीत नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद पुण्यात उमटताना दिसले. पुण्यात मॉडेल कॉलनी येथील नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमले होते. यावेळी महिलांनी नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आलीय. महिलांनी हातात टायर आणि मर्सिडीज गाड्याचे पोस्टर आणले होते त्यावरती टायरवाल्या काकू असं लिहण्यात आलं आहे. यावेळी बोलताना महिला महिला म्हणाल्या, नीलम गोऱ्हे यांनी मुलाखतीमध्ये पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचा अपमान केला आहे, त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. गोऱ्हेंनी आत्तापर्यंत पदासाठी किती गाड्या दिल्या त्याच्या पावत्या त्यांनी द्याव्या, असंही या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

त्याचबरोबर त्यांनी सोबत आणलेल्या खेळण्यातील मर्सिडीज गाड्या दाखवत नीलम गोऱ्हे तुम्ही आता यातून फिरा म्हणत हल्लाबोल केला आहे, तर वाढदिवसाच्या वेळी नीलम गोऱ्हे आम्हाला सामान्य कार्यकर्त्यांना माडंव घालायला सांगतात, एलईडीच्या माळा लावालया लावतात. प्रत्येक वेळी तिकीट देताना पैशाची मागणी करतात, त्या नीलमताई आता यावर बोलतील का म्हणत महिलांनी घोषणाबाजी केली आहे. त्या जोड्यांनी मारण्याच्या लायकीच्या आहेत असं म्हणत महिलांनी त्यांच्या फोटोला तुडवलं आहे. यावेळी महिला पदाधिकारी मोठ्या आक्रमक झाल्याच्या दिसून आल्या. काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

नीलम गोऱ्हे यांनी माफी मागावी अन् पावत्या द्याव्या

नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागावी आणि त्यांनी आत्तापर्यंत मिळालेल्या पदासाठीच्या पावत्या पत्रकार परिषद घेऊन दाखवाव्यात असं महिलांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्या ज्या गाडीमधून फिरत आहेत त्या देखील पक्षातील गटनेत्यांनी दिली आहे. त्यांच्या वाढदिवसादिवशी खाणं, पिणं, मंडप आणि सर्व खर्च त्या आमच्याकडून घेत असल्याचा देखील दावा यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 

नीलम गोऱ्हे यांनी साड्या घेतल्या

नीलम गोऱ्हे भेटीसाठी महिलांकडून गिफ्ट घ्यायच्या. त्या आम्हाला वेळ देण्यासाठी आमच्याकडून साडी घ्यायच्या, त्यांनी आमच्याकडून दहा ते पंधरा हजारांची साडी देखील घेतली असा आरोप देखील महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांच्या वाढदिवसाला आणि इतर पदासाठी देखील वेगवेगळ्या गोष्टी घ्यायच्या अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई, 'प्रोजेक्ट एक्स' हाऊस पार्टीवर क्राईम ब्रँचची रेड, तरुण-तरुणी पोलिसांच्या ताब्यात
पुण्यात मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई, 'प्रोजेक्ट एक्स' हाऊस पार्टीवर क्राईम ब्रँचची रेड, तरुण-तरुणी पोलिसांच्या ताब्यात
Jaykumar Gore on Supriya Sule: पुण्यात कितीचा घोडेबाजार झाला? सुप्रिया सुळेंच्या आरोपावर जयकुमार गोरेंचा जोरदार पलटवार; म्हणाले...
पुण्यात कितीचा घोडेबाजार झाला? सुप्रिया सुळेंच्या आरोपावर जयकुमार गोरेंचा जोरदार पलटवार; म्हणाले...
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत

व्हिडीओ

Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Afghanistan: अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
गुलाबी आँखे जो तेरी देखी..; नागपुरात मुख्यमंत्र्यांनी गायले दोन गाणे; दुसरं गाणं धर्मेंद्रचं सुपरहीट, टाळ्या वाजवून दाद
गुलाबी आँखे जो तेरी देखी..; नागपुरात मुख्यमंत्र्यांनी गायले दोन गाणे; दुसरं गाणं धर्मेंद्रचं सुपरहीट, टाळ्या वाजवून दाद
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर अभिजितचा पलटवार
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या 'अराजकतावादी' टीकेवर अभिजितचा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
BCPL: शेअर 100 रुपयांपेक्षा कमी, पूर्व रेल्वेकडून 4.72 कोटींच्या कामाची ऑर्डर, सोमवारी शेअरमध्ये तेजी की घसरण? 
शेअर 100 रुपयांपेक्षा कमी, पूर्व रेल्वेकडून 4.72 कोटींच्या कामाची ऑर्डर, सोमवारी शेअरमध्ये तेजी की घसरण? 
Embed widget