एक्स्प्लोर
'लग्न आहे का डान्सबार.., लग्नातील पार्टीचा व्हिडीओ पाहून कोकण हार्टेड गर्ल ट्रोल; नेटकरी म्हणाले हीच का कोकणची संस्कृती!
कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळख असलेली अंकिता वालावलकर हिने नुकतेच लग्न केले. या लग्नातील पार्टीमुळे तिला ट्रोल केलं जातंय.
ankita walawalkar marriage
1/9

प्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर म्हणून ओळख असलेली अंकिता वालावलकर म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल नुकतंच लग्नबंधनात अडकली आहे.
2/9

गेल्या चार दिवसांपासून तिचा लग्नसोहळा सुरू होता. या काळात हळदी समारंभापासून ते लग्नविधीपर्यंत असे वेगवेगळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
3/9

कोकण हार्टेड गर्लने तिच्या लग्नानिमित्त खास डान्स पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अनेक सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्स सामील झाले होते.
4/9

या आमंत्रितांनी मोठ्या उत्साहात पार्टी साजरी केली. डान्सही केला. मात्र याच कारणामुळे कोकण हार्टेड गर्ल सध्या ट्रोल होतेय. इन्स्टाग्रामवर तिने पोस्टक केलेल्या पार्टीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.
5/9

एका नेटकऱ्याने तर हे लग्न आहे का डान्स बा काहीही कळेना, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एखा नेटकऱ्याने हीच का ती कोकणची संस्कृती म्हणत कोकण हार्टेड गर्लला ट्रोल केलंय.
6/9

काही नेटकऱ्यांनी अंकिताला पाठिंबादेखील दिलाय. तिचं लग्न आहे. तिला हवं तसं ती हा सोहळा साजरा करेल. लोकांना अशा पद्धतीने उत्सव साजरा करता येत नाही, त्यामुळे दुसऱ्यांना नावबोट ठेवले जातायत, असं म्हणत एका नेटकऱ्याने अंकिताला पाठिंबा दिलाय.
7/9

एका नेटकऱ्यांनी तिला डबल ढोलकी म्हटंलय. तर दुसऱ्या नेटकऱ्याने नेटकऱ्यांना चांगलंच खडसावलंय. तुम्ही तिचे इन्स्टाग्राम खाते तपासून पाहा. तिने लग्नाचे सर्व विधी ती संस्कृतीला धरुनच केले आहे. तिचे लग्न आहे. तिने काय करावे आणि काय करू नये हा तिचा प्रश्न आहे, असे म्हणत अंकिताला पाठिंबा दिलाय.
8/9

अंकिता वालावलकरच्या नवऱ्याचे नाव कुणाल भगत असे आहे. तो संगीत दिग्दर्शक आहे. त्याने आतापर्यंत अनेक प्रसिद्ध गाण्यांना संगीत दिलंय.
9/9

बऱ्याच दिवसांपासून अंकिता आणि कुणाल एकमेकांना डेट करत होते. आता त्यांनी लग्न केलंय. अंकिता वालावलकर बिग बॉस मराठीमुळे चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
Published at : 18 Feb 2025 04:35 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























