एक्स्प्लोर

APMC Meeting : बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद पुण्यात, राज्यभरातून पदाधिकारी सहभागी होणार

Agricultural Produce Market Committee : राज्यातील 305 बाजार समित्यांच्या माध्यमातून राज्यात उत्पादित शेतमालाची सुरळीत विक्री व्यवस्था विकसित करण्याचे कामकाज गेल्या 40 वर्षापासून सुरू आहे.

मुंबई: राज्यातील बाजार समित्यांच्या विविध विषयांसंदर्भात संवाद साधण्यासाठी सोमवार, 24 फेब्रुवारी रोजी पुणे येथे बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पणन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिली. या परिषदेत राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक व सचिव सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे मार्फत आयोजित ही परिषद पुण्याच्या बाणेरमधील बंटारा भवन येथे होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. तर पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यासह कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे आदी या परिषदेस उपस्थित राहणार असल्याची माहिती मंत्री रावल यांनी दिली. 

राज्यातील 305 बाजार समित्या व त्यांचे 623 उप बाजारांच्या माध्यमातून राज्यात उत्पादित शेतमालाची सुरळीत विक्री व्यवस्था विकसित करण्याचे कामकाज गेल्या 40 वर्षापासून सुरू आहे. राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात कालानुरूप बदल घडविणे, शेतमालाच्या विपणनामध्ये आधुनिक बाबींचा अंगीकार करणे, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोई-सुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाय योजना आदी विषयांसंदर्भात या परिषदेमध्ये चर्चा केली जाणार आहे.

राज्यात कृषी पणन व्यवस्थेत अद्ययावतपणाबरोबरच सुसूत्रता आणि समन्वयता आणण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय नियोजनाचे कामकाजही करण्यात येत आहे. कृषी पणन मंडळाने कृषी पणन व्यवस्थेत आधुनिकीकरण, सुधारणा आणण्याबरोबरच राज्यात कृषी पणन व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध प्रकल्प राबविणे, योजना राबविणे, नवीन कार्यक्रम आखणे याचबरोबर शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या संस्थांच्या विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील बाजार समित्यांचे पदाधिकारी, अधिकारी/ कर्मचारी यांच्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तसेच राज्यात कृषी मालासाठी निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी करुन त्यांच्यामार्फत निर्यातवृद्धी करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून या परिषदेचे आयोजन करण्यात येत असल्याचे मंत्री श्री.रावल यांनी सांगितले.

या परिषदेमध्ये राज्यातील बाजार समित्यांचे आधुनिकीकरण, बाजार समितीनिहाय विकास आराखडा, बाजार समित्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अ़डीअडचणी व उत्पन्न वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना आदींबाबत चर्चा अपेक्षित असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली. 
 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल
काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
Iran Crisis: इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
Beed News: अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!
अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!

व्हिडीओ

Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठकारेंची गंभीर आरोप
Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल
काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
Iran Crisis: इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
Beed News: अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!
अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!
Raj Thackeray BMC Election 2026: राज-उद्धव ठाकरेंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकायचा आत्मविश्वास, सांगितलं कारण
ठाकरे बंधूंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकण्याचा कॉन्फिडन्स का? सांगितलं कारण
Baramati Crime News: पिकअप गाडी, 2 तलवारी, 3 कोयते, 1 लोखंडी रॉड अन् बरचं काही; बारामती पोलिसांनी पकडली शेळ्या अन् बोकड चोरणारी टोळी
पिकअप गाडी, 2 तलवारी, 3 कोयते, 1 लोखंडी रॉड अन् बरचं काही; बारामती पोलिसांनी पकडली शेळ्या अन् बोकड चोरणारी टोळी
Raj Thackeray on Mumbai: राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
Video : रोहित मी तुला कर्णधारच बोलणार, कारण....; सूर्यकुमार यादव, शाहरुख खानसमोर जय शाह मनातलं सगळं बोलले, VIDEO
रोहित मी तुला कर्णधारच बोलणार, कारण....; सूर्यकुमार यादव, शाहरुख खानसमोर जय शाह मनातलं सगळं बोलले, VIDEO
Embed widget