Mahashivratri 2025: महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण करण्याचा 'हा' शुभ मुहूर्त माहितीय? धार्मिक महत्त्व काय? फार कमी लोकांना माहीत
Mahashivratri 2025: महाशिवरात्रीच्या दिवशी लोक मंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करतात. पण ही पूजा एखाद्या शुभ मुहूर्तावर केल्यास तुम्हाला इच्छित फळ लवकर मिळते, अशी धारणा आहे.

Mahashivratri 2025: हिंदू धर्मातील सर्वात शक्तिशाली देवता म्हणून भगवान शिवाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या विश्वाच्या सुरुवातीपूर्वीही भगवान शिव अस्तित्वात होते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, भगवान शिव हे वाईटाचा आणि अंधकार इत्यादींचा नाश करणारे आहेत. त्रिदेवांमध्ये भगवान शिव सर्वात शक्तिशाली मानले जातात. महाशिवरात्री हा सण भगवान शंकराच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे. या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घ्या. जो फार कमी लोकांना माहीत असावा..
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण करण्याचा शुभ मुहूर्त
धार्मिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण केल्याने जीवन सुखी आणि समृद्ध होते. यंदा महाशिवरात्री हा सण बुधवार, 26 फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घ्या. या शुभकाळात शिवलिंगावर जल अर्पण केल्याने भगवान शंकराचे विशेष पुण्य आणि आशीर्वाद प्राप्त होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
सकाळच्या अमृत कालची वेळ सकाळी 7:28 ते 9:42 अशी आहे
संध्याकाळच्या प्रदोष कालची वेळ संध्याकाळी 6:17 ते 6:42 पर्यंत आहे
रात्रीच्या पूजेसाठी चार तास नमूद करण्यात आले आहेत
पहिला प्रहर संध्याकाळी 6:19 ते 9:26 पर्यंत.
दुसरा प्रहर रात्री 9.26 ते 12:34 वा.
तिसरा प्रहर मध्यरात्री 12:34 ते पहाटे 3:41 पर्यंत.
चौथा प्रहर पहाटे 3:41 ते 6:48 पर्यंत
शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे धार्मिक महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार, शिवलिंगावर जल अर्पण केल्याने शिव तत्व प्रसन्न होते, ज्यामुळे जीवनात शांती आणि समृद्धी येते. शास्त्रानुसार शिवलिंगावर जलाभिषेक केल्याने जीवनातील सर्व पापे नष्ट होऊन आत्मा शुद्ध होतो. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते. महाशिवरात्रीला जल अर्पण केल्याने विशेषत: धन, आरोग्य आणि कुटुंबात सुख-समृद्धी लाभते. शिवलिंगावर जल अर्पण केल्याने चंद्रदोष आणि काल सर्प दोष यांचाही प्रभाव कमी होतो.
शिवलिंगाला जल अर्पण करण्याची पद्धत
धार्मिक मान्यतेनुसार, तांबे, चांदी किंवा पितळेचे भांडे हे गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने भरावे. ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा उच्चार करताना शिवलिंगावर जल अर्पण करावे. पाण्यासोबत बेलपत्र, अक्षता (तांदूळ) आणि धोतराही अर्पण करा. यानंतर भगवान शंकराची आरती करून प्रसाद वाटप करावा.
हेही वाचा>>>
Shani Dev: शनीची साडेसाती कधीपर्यंत त्रास देणार? मेष ते मीन 12 राशीवर कधीपर्यंत अशुभ प्रभाव असणार? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )




















