एक्स्प्लोर
Raj Thackeray Devendra Fadnavis Meet: राजपुत्र अमित ठाकरे आमदार होणार?; भाजप अन् मनसेच्या मैत्रीचा नवीन अंक, 'शिवतीर्थ'वर काय घडलं?
Raj Thackeray Devendra Fadnavis Meet: देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास सव्वा तास चर्चा झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Raj Thackeray Devendra Fadnavis Meet
1/8

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी (10 फेब्रुवारी) मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.
2/8

राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मुंबईतील शिवतीर्थ येथे देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
3/8

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास सव्वा तास चर्चा झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
4/8

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीत भाजपच्या कोट्यातून राज्यपालनियुक्त आमदाराची मनसेला ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राजपुत्र अमित ठाकरे विधानपरिषदेचे आमदार होऊ शकतात.
5/8

भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अमित ठाकरेंना घेतलं जाण्याची शक्यता आहे.
6/8

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप मनसेची साथ घेणार असल्याची माहिती आहे.
7/8

अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक माहीम विधानसभा मतदारसंघातून लढवली होती. माहीममध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
8/8

माहीमची निवडणूक तिरंगी झाली होती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांनी सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांचा पराभव केला होता.
Published at : 10 Feb 2025 11:30 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र























