Suresh Dhas on Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा; सुरेश धसांकडून मागणी
अंजली दमानियांपाठोपाठ सुरेश धस यांनीही कृषी घोटाळ्यावर मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेतलीये. मागणी नसतानाही युरिया खरेदी करण्यात आल्याचा दावाही सुरेश धस यांनी केलाय... हे आरोप करतानाच कृषी विभागातील रेट कार्डही सुरेश धस यांनी वाचून दाखवलं. हे सर्व आरोप करतानाच सुरेश धस यांनी पहिल्यांदाच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही मागणी केलीये.
दरम्यान अंजली दमानिया करत असलेल्या आरोपांनंतर आता धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने स्पष्टीकरण दिलंय. अंजली दमानिया खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरोप करत असल्याचा आरोप यात करण्यात आलाय...दमानिया म्हणतात ते पत्र सचिवांनी तयार केलेलं टिपण आहे, त्यावर तारीख टाकायची पद्धत नाही, असा दावा त्यात करण्यात आलाय. जाणीवपूर्वक केलेल्या बदनामीबद्दल दमानिया यांच्याविरोधात फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया असल्याचंही त्यात म्हटलंय.
दरम्यान धनंजय मुंडेंविरोधात आघाडी उघडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांवर, वकील गुणरत्ने सदावर्तेंनी आगपाखड केलीय.. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी दमानिया मानसिक त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केलाय..
एबीपी माझाकडे २०० कोटींच्या कृषी खात्याच्या त्या नव्या जीआरवर प्रश्न उपस्थित करणारी कागदपत्रं हाती लागली आहेत. २३ सप्टेंबर आणि ३० सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत नव्या जीआरसाठी मान्यता मिळाल्याचा मुंडेंचा दावा आहे. धनंजय मुंडेंनी कृषी सचिवांना लिहीलेलं पत्रही माझाच्या हाती लागलंय. या पत्रावर कोणताही तारीख नाही ही धक्कादायक बाब उघड झालीय. २३ सप्टेंबरच्या बैठकीत कृषी विभागाचा एकही विषय नसल्याचं उघड झालंय. ३० सप्टेंबरच्या बैठकीत ३ विषय कृषी विभागाशी संबंधित होते. मात्र त्यात बळकटीकरण योजनेशी संबंधित एकही विषय नव्हता असं दिसून आलंय.























