Sudhir Mungantiwar: राज ठाकरे स्वतः च्या मुलापेक्षा सहकाऱ्यांचा आधी विचार करतील; फडणवीस-ठाकरे यांच्या भेटीवर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
Sudhir Mungantiwar: राज ठाकरे स्वतःच्या मुलाचा विचार करणार नाही. त्यांना विचार करायचा असेलच तर ते आपल्या पक्षातल्या एखाद्या सहकाऱ्याचा करतील. अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय.

चंद्रपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ही भेट म्हणजे संवाद आहे. आम्ही निवडणुका सोबत लढलोच पाहिजे असं आवश्यक नाहीये. मात्र ज्यांची वैचारिक भूमिका आमच्या विरोधात आहे. त्यांच्या मनापर्यंत हा विचार पोहोचला पाहिजे की प्रखर राष्ट्रवादासाठी, परिवाराचा विचार करण्याऐवजी देशाचा विचार करणाऱ्यांनी एकत्र बसून विचार केला पाहिजे. काही पक्ष फक्त राज्याच्या विकासात स्पीड ब्रेकर बनतात. मात्र राज ठाकरे (Raj Thackeray) असे नेते नाहीत, ते स्पीड ब्रेकर बनत नाही तर सूचना करतात मार्गदर्शन करतात. त्यांच्या सूचना रास्त असतील तर सरकारने त्या मान्य कराव्यात.
किंबहुना अमित ठाकरेंना (Amit Thackeray) विधान परिषदेवर घेण्याबाबत कोर टीममध्ये काही चर्चा झालेली नाही. राज ठाकरे स्वतःच्या मुलाचा विचार करणार नाही. त्यांना विचार करायचा असेलही तर ते आपल्या पक्षातल्या एखाद्या सहकाऱ्याचा विचार करतील. अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे.
....तर अजित पवार यांनी चर्चा केली पाहिजे- सुधीर मुनगंटीवार
अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनसे बाबत जे वक्तव्य केलं आणि दुरावा निर्माण झाला म्हणताय तर त्याबाबत अजित पवार यांनी चर्चा केली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करून काय फायदा, अजित पवारांच्या नेतृत्वावर मनसेने प्रश्नचिन्ह उभं केलंय. त्यामुळे अशा प्रकारचं उत्तर त्यांच्याकडून अपेक्षितच आहे. असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
आमच्या पंकजाताई अतिशय साध्या नेत्या, मात्र..
आमच्या पंकजाताई अतिशय साध्या नेत्या आहेत. मात्र त्या जेव्हा काही बोलतात त्याचा अन्वयार्थ काढल्या जातो. भाजपला मोठं करण्यात गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे गोपीनाथजींना चाहणारे तर लाखोंच्या संख्येत असणारच आहेत. पण त्यांचा पक्षच भाजप आहे, त्यामुळे प्रश्नच उपस्थित होत नाही. असे म्हणत मंत्रि पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
सरकार अशी आपत्ती कदापिही ओढवून घेणार नाही- सुधीर मुनगंटीवार
दरम्यान आपत्ती व्यवस्थापन समितीमधून एकनाथ शिंदे यांना वगळलं असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मला त्या जीआरची माहिती नाही. मात्र आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये वित्त विभागाचे मंत्री म्हणून अजित पवार असू शकतात. पैसे देण्याचा ज्या ठिकाणी विषय असतो तिथे वित्तमंत्री असतात. उपमुख्यमंत्री म्हणून जर तुम्ही विचार केला तर हा एकनाथ शिंदेंवर अन्याय होईल, त्यामुळे एकनाथ शिंदेंना डावलण्याचा विषयच नाही. जर उपमुख्यमंत्री हे वित्तमंत्री नसते तर तेही कदाचित या समितीत नसते. आपत्ती व्यवस्थापनामध्ये सरकार अशी आपत्ती कदापिही ओढवून घेणार नाही. असेही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
