Investment Plan : कमी गुंतवणूक, अधिक नफा! 20 हजार रुपयांच्या पगारात कसं कराल 1 कोटीचं नियोजन?
कमी पगार असलेल्यांना लोकांना सहसा बचत करणे शक्य होता नाही. पण तुम्ही जर योग्य नियोजन केलं तर तुम्ही देखील कमी गुंतवणूक करुन करोडपती होऊ शकता.
Investment Plan : कमी पगार असलेल्यांना लोकांना सहसा बचत करणे शक्य होत नाही. त्यांच्या मनात एक प्रश्न सातत्यानं असतो, तो म्हणजे थोडी बचत (saving) त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते का? त्यामुळं त्यांची निवृत्ती सुरक्षित होऊ शकते का? बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की बचत फक्त श्रीमंत किंवा जास्त पगार मिळवणाऱ्यांसाठीच शक्य आहे. पण तुम्ही सुद्धा कमी बचत करुन जास्त नफा मिळवू शकता. फक्त यासाठी योग्य नियोदन करणं गरजेचं आहे.
उत्पन्नातील किमान 20 टक्के बचत करावी
कमी पगारामुळे तुम्ही कधीच करोडपती होऊ शकत नाही, तर हा गैरसमज आहे. योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास, फक्त 20,000 रुपये मासिक उत्पन्न घेऊनही तुम्ही करोडपती होऊ शकता. तज्ज्ञांचे मते बचत ही एक सवय आहे. प्रत्येक व्यक्तीने ही सवय अंगीकारली पाहिजे, मग त्यांचे उत्पन्न कितीही असो. तसेच, केवळ बचत करणे पुरेसे नाही, तर ही बचत योग्य ठिकाणी गुंतवणे देखील महत्त्वाचे आहे, कारण कालांतराने गुंतवलेले पैसे वाढत जातात आणि तुम्हाला चांगला परतावा मिळतो. आता प्रश्न पडतो की किती बचत करायची? यासाठी प्रत्येक व्यक्तीने त्याच्या उत्पन्नातील किमान 20 टक्के बचत करावी, असा सर्वसाधारण नियम सांगितला जातो.
पगार 20,000 रुपये? बचत किती?
जर तुमचे मासिक उत्पन्न 20,000 रुपये असेल तर या नियमानुसार तुम्ही दरमहा 4,000 रुपये वाचवले पाहिजेत. याचा अर्थ असा की तुम्हाला तुमचा घरखर्च आणि इतर गरजा 16,000 रुपयांमध्ये भागवाव्या लागतील. तुम्ही ही बचत दर महिन्याला गुंतवावी आणि ती दीर्घकाळ चालू ठेवावी.
कुठे कराल पैशांची गुंतवणूक?
आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण म्युच्युअल फंड आणि SIP (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन - SIP) हे गुंतवणुकीचे उत्तम पर्याय मानले जातात. एसआयपीद्वारे गुंतवणूक केल्याने दीर्घ मुदतीत तुम्हाला जबरदस्त परतावा मिळू शकतो. SIP चा सरासरी वार्षिक परतावा 12 टक्क्यांपर्यंत असू शकतो, जो इतर निश्चित उत्पन्न पर्यायांपेक्षा चांगला आहे.
एक कोटी रुपयांचा निधी कसा निर्माण कराल?
समजा तुम्ही SIP मध्ये दरमहा 4,000 गुंतवले आणि ते 28 वर्षे चालू ठेवल्यास, तुमची एकूण ठेव ₹13,44,000 होईल. परंतु या गुंतवणुकीवर तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी ₹ 96,90,339 चा नफा मिळेल. अशा प्रकारे, तुम्हाला एकूण ₹1,10,34,339 मिळतील. तुम्ही ही गुंतवणूक 30 वर्षे सुरू ठेवल्यास, तुमची एकूण रक्कम ₹1,41,19,655 पर्यंत वाढेल.
महत्वाच्या बातम्या:





















